Yavatmal Crime : संतापजक! ३० वर्षीय नातवाचा ८५ वर्षीय आजीवर अत्याचार; काळीमा फासणारी घटना

एका ३० वर्षीय नराधम नातवाने आपल्या ८५ वर्षीय आजीवर बलात्कार केला आहे.
Yavatmal crime news
Yavatmal crime news saam tv

Yavatmal Crime News : गेल्या काही दिवसांपासून राज्यात अत्याचारांच्या घटनेत मोठी वाढ झाली आहे. अत्याचार करणाऱ्या नराधमांवर कठोरात कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी केली जात आहे. अशातच यवतमाळ जिल्ह्यातून एक संताजनक घटना उघडकीस आली आहे. येथे एका ३० वर्षीय नराधम नातवाने आपल्या ८५ वर्षीय आजीवर बलात्कार केला आहे. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी यवतमाळ शहर पोलिसांनी तरुणाला अटक केली. (Latest Marathi News)

Yavatmal crime news
Viral News : १६ वर्षीय विद्यार्थ्यावर जडलं शिक्षिकेचं प्रेम; नंतर जे घडलं ते चक्रावून टाकणारं

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अकोला (Akola) जिल्ह्यातील ८५ वर्षीय वृद्ध महिला आपल्या पतीसह यवतमाळ (Yavatmal) येथे आली होती. २७ डिसेंबर २०२२ रोजी वृद्ध महिला घरात झोपली होती. यावेळी रात्री दीड वाजेच्या सुमारास या वृद्ध महिलेचा नराधम नातू तिच्याजवळ आला. त्याने नग्न होत वृद्ध आजीशी अश्लील चाळे सुरू केले.

Yavatmal crime news
Crime News: भाऊ कामाला गेल्यावर वहिनीच्या खोलीत शिरायचा दीर; नवऱ्याला कळताच घडलं भयंकर

जेव्हा नराधम नातू हा आपल्या आजीसोबत गैरकृत्य करत होता, तेव्हा त्याच्या आजोबाने त्याला बघितले. त्यानंतर त्यांनी नराधम नातवाला तात्काळ बाजूला केले. धक्कादायक बाब म्हणजे यावेळी नातवाने आजीसह आजोबाला मारहाण देखील केली. या सर्व प्रकारानंतर आजोबाने या घटनेची तक्रार गुरुवारी (१९ डिसेंबर) यवतमाळ शहर  पोलीस (Police) ठाण्यात दिली. तक्रार दाखल होताच, पोलिसांनी अत्याचाराचा गुन्हा नोंद करून नराधम नातवाला अटक केली आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com