Nashik News
Nashik NewsSaam tv

Nashik News: पोटात दुखू लागल्याने तरुण रुग्णालयाकडे निघाला; धावत्या दुचाकीवर जातानाच विपरीत घडलं

नाशिकच्या तालुक्यातील सोनांबे येथील ३० वर्षीय तरुणाला पोटात दुखू लागल्याने दुचाकीवरून रुग्णालयात नेत होते.

तबरेज शेख

Nashik News : नाशिकमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. नाशिकच्या सोनांबे येथील ३० वर्षीय तरुणाला पोटात दुखू लागल्याने कुटुंबीय दुचाकीवरून रुग्णालयात नेत होते. मात्र, दुचाकीवर जाताना हृदयविकाराचा झटका आल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मंगळवारी रात्री ही घटना घडली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, ३० वर्षीय अमोल प्रकाश शिरसाठ याच्या काल सायंकाळी अचानक पोटात दुखत होते. पोट अधिक दुखू लागल्याने त्याला त्रास असह्य होत होता. त्यामुळे अमोलने त्याच्या कुटुंबीयांना ही बाब सांगितली. त्यामुळे अमोलचे काका व आई त्याला उपचारासाठी दुचाकीवरून घेऊन रस्त्याने सिन्नरकडे येत होते. अमोल हा काका व आईच्या मधोमध तरुण दुचाकीवर बसला होता.

Nashik News
Vaibhav Kadam : 'एका घटनेमुळे माझ्या आयुष्याची वाट लागली...' जितेंद्र आव्हाडांच्या बॉडीगार्डचे जीवन संपवण्याआधीचे 7 स्टेटस

अमोल घोटी महामार्गावरील बंधन लॉन्सजवळ आल्यावर त्याला हृदयविकाराचा धक्का बसला. काही वेळातच त्याने अंग सोडून दिले. पाठीमागे बसलेल्या आईने कसेबसे त्याला पकडून ठेवत सिन्नरमधील खाजगी रुग्णालयात घेऊन आले.

मात्र, डॉक्टरांनी त्यास तपासल्यावर मृत घोषित केले. यानंतर डॉक्टरांकडून नातेवाईकांना सिन्नर उपजिल्हा रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला. त्यांच्या अचानक मृत्यूने सिन्नर तालुक्यातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Nashik News
Karuna Sharma News: 'मी कायद्यानुसार कोट्यवधी रुपयांची मालकीण...;करुणा शर्मा यांचा धनंजय मुंडेंवर पुन्हा गंभीर आरोप

 अंबाबाईचं दर्शन घेतलं अन् मंदिरातून बाहेर पडताच भाविकाचा मृत्यू

कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर पडलेल्या भाविकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. आज पहाटे ही घटना घडली आहे. रामनाथ गबाजी जाधव ( वय 62 वर्ष) असं मृत भाविकांचं नाव आहे.

रामनाथ जाधव हे अहमदनगर येथील रहिवाशी होते. करवीर निवासिनी अंबाबाई देवीचे दर्शन घेण्यासाठी ते अहमदनगरहून त्यांचे कुटुंबीय आणि मित्र परिवारासोबत आले होते. पहाटे पाच वाजता अंबाबाई देवीचे दर्शन त्यांनी घेतलं. त्यानंतर मंदिरातून बाहेर पडताना अचानक त्यांच्या छातीत दुखू लागलं होते.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com