शब्द न पाळल्याने ३ हजार आशा सेविकांनी लसीकरणाचे काम केले बंद

ही रक्कम जाेपर्यंत मिळणार नाही ताेपर्यंत आम्ही काम बंद आंदाेलनाची भुमिका घेतली आहे.
आशा सेविका (संग्रहित छायाचित्र)
आशा सेविका (संग्रहित छायाचित्र)

कोल्हापूर : थकीत रक्कम न मिळाल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील तीन हजार अधिक आशा सेविकांनी लसीकरणाचे काम बंद केले आहे. लसीकरणाशी संबंधित कामासाठी दररोज दाेनशे रुपये देण्याचे आश्वासन आराेग्य विभागाने आशा सेविकांना दिले हाेते. परंतु त्याची अमंलबजावणी न झाल्याने आशा सेविकांनी काम बंद आंदाेलनाचा पवित्रा घेतला आहे. 3000 asha workers stopped vaccine related works in kolhapur

आशा सेविका (संग्रहित छायाचित्र)
PRESIDENTS CUP : शस्त्रातील बिघाडानंतरही राहीची दमदार कामगिरी

आरोग्य विभागाने आशा सेविकांना लसीकरण केलेल्या आणि लसीकरण न केलेल्या लोकसंख्येचे सर्वेक्षण आणि लसीकरण न केलेल्या नागरिकांचे समुपदेशन यासह अनेक कामांची जबाबदारी साेपविण्यात आली हाेती. ही जबाबदारी त्या समर्थपणे पेलत हाेत्या अशी माहिती आशा सेविका संघटनेच्या जिल्हाध्यक्ष नेत्रदीपा पाटील यांनी दिली.

आशा सेविका संघटनेच्या जिल्हाध्यक्ष नेत्रदीपा पाटील म्हणाल्या आम्ही जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना थकीत रक्कम मिळावी यासाठी पत्र लिहिले आहे. प्रशासनाने डेटा ऑपरेटरना लसीकरणाशी संबंधित डेटा अपलोड करण्यासाठी ५०० रुपये मानधन दिले आहे. लसीकरणाशी संबंधित कामासाठी आशा सेविकांना त्यांची सेवा बजावण्यासाठी २०० रुपये देणे बंधनकारक आहे. ही रक्कम जाेपर्यंत मिळणार नाही ताेपर्यंत आम्ही काम बंद आंदाेलनाची भुमिका घेतली आहे.

edited by : siddharth latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com