धक्कादायक! 6 महिन्यात जिल्ह्यातून 307 महिला व मुली बेपत्ता

जिल्ह्यात 1 जानेवारी ते 30 जून दरम्यान 480 जण बेपत्ता असल्याच्या तक्रारी आल्या आहेत.
धक्कादायक ! 6 महिन्यात जिल्ह्यातून 307 महिला व मुली बेपत्ता
धक्कादायक ! 6 महिन्यात जिल्ह्यातून 307 महिला व मुली बेपत्तासंजय जाधव

संजय जाधव
बुलढाणा : कोरोनाच्या Corona सहा महिन्याच्या काळात बुलडाणा Buldhana जिल्ह्यातून 480 जण बेपत्ता असल्याच्या तक्रारी विविध पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्या आहेत, ज्यापैकी 173 पुरुष तर तब्बल 307 महिला व मुलींचा समावेश असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्या मध्ये 242 जणांचा शोध लावण्यात पोलिसांना Police यश आहे आहे.

वेगवेगळ्या कारणावरून घरून न सांगता निघून जाण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होतांना दिसत आहे. बुलडाणा जिल्ह्यात 1 जानेवारी ते 30 जून 2021 या सहा महिन्यांच्या कालावधी मध्ये विभिन्न वयोगटातील 480 जण जण बेपत्ता असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, आणि यामध्ये सर्वाधिक प्रमाण हे महिला व मुलींचे आहे. तर बदनामी पोटी अनेकदा तक्रारी दिल्या जात नाहीत त्यामुळे हा आकडा वाढण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

हे देखील पहा-

बेपत्ता असणाऱ्या महिलांमध्ये 18 ते 30 या वयोगटातील महिलांची संख्या ही जास्त आहे. बेपत्ता असलेल्या एकूण 480 पैकी 242 म्हणजे निम्मे लोकांचा पोलिसांनी शोध लावला आहे. तर इतरांचा शोध घेणे सुरू आहे. अलीकडच्या काळात न सांगता निघून जाणे किंवा पळून जाणे याचे प्रमाण वाढले आहे, समोर आलेली शासकीय आकडेवारी हीच भुवया उंचावणारी आहे, मात्र ही संख्या यापेक्षाही जास्त असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

धक्कादायक ! 6 महिन्यात जिल्ह्यातून 307 महिला व मुली बेपत्ता
Konkan Flood: ठाकरे सरकारकडून मदतीसाठी दिरंगाई; न्यायिक चौकशीची मागणी

महिला किंवा मुलगी घरून निघून गेल्या नंतर अनेक पालक बदनामी पोटी तक्रार दखलच करत नसल्याचे बोलल्या जाते. मात्र न सांगता निघून जाणे यामध्ये महिला व मुलींचा अधिक का आहे..? या संदर्भात आम्ही महिला तज्ञांचं कायदेशर मत जाणून घेतलंय, त्यांच्यामते यासाठी दोन घटना प्रामुख्याने कारणीभूत असू शकतात यामध्ये सोशल मीडियाचा गैरवापर तर दुसरा म्हणजे मुले आणि पालक यांच्यामध्ये दूर होत चाललेला सुसंवाद ही दोन कारणे यासाठी कारणीभूत असू शकतात असे त्यांनी म्हंटले आहे.

Edited By-Sanika Gade

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com