मुंबईत ३५ वर्षीय लेखिकेवर ७५ वर्षीय व्यावसायिकाचा बलात्कार; पीडितेला दाऊदची धमकी?

व्यावसायिकाने महिलेला थेट कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या नावाने धमकावले.
मुंबईत ३५ वर्षीय लेखिकेवर ७५ वर्षीय व्यावसायिकाचा बलात्कार; पीडितेला दाऊदची धमकी?
Mumbai CrimeSaam TV

मुंबई : मुंबईच्या जुहू येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये ७५ वर्षीय व्यावसायिकाने एका ३५ वर्षीय लेखिकेवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी व्यावसायिकावर अंबोली पोलिस ठाण्यात महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार शुक्रवारी पोलिसांनी ३७६(२) एन, ५०४ भा द वि कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे व्यापाऱ्याने महिलेला याची वाश्चता कुठेही न करण्यासाठी 'डी कंपनी'ची धमकी दिल्याने पोलिस कामाला लागले आहेत. (Mumbai Crime News)

Mumbai Crime
Mumbai Corona Update: सतर्क राहा! कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ; ताजी आकडेवारी पाहा

१९९३ च्या मुंबईसाखळी स्फोटाचा मुख्य सूत्रधार कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याचे नाव समोर येताच हत्या, खंडणी, धमकी, जिवे मारण्याचा प्रयत्न या सारख्या गंभीर गुन्ह्यांचा पाडाच वाचला जातो. मात्र बलात्काराच्या एका गुन्ह्यात चक्क दाऊदच्या नावाने धमकवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

अंबोली पोलिस ठाण्यात एका ३५ वर्षीय लेखिकेने दिलेल्या तक्रारीनुसार दादरमध्ये राहणाऱ्या एका ७५ वर्षीय व्यावसायिकाने तिच्यावर अंधेरीच्या जेबीनगर येथील सन अॅण्ड शील (आताचे नाव द ऑन टाईम हॉटेल) येथे मे महिन्यात वेळोवेळी अत्याचार केले आहेत.

Mumbai Crime
Video Viral करण्याची धमकी देत ७ जणांकडून तरुणीवर लैंगिक अत्याचार; तरुणीने उचललं टोकाचं पाऊल

याच दरम्यान व्यावसायिकाने तिच्याकडून २ कोटी व्याजाने घेऊन ते परत न केल्याचाही दावा केला आहे. या पैशासाठी त्याच बरोबर महिलेवर केलेल्या अत्याचारबाबत महिलेने आवाज उठवण्याचा प्रयत्न केला असता. व्यावसायिकाने महिलेला थेट कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या नावाने धमकावले.

अंडरवल्ड डॉन दाऊद इब्राहिम माझा मित्र असून हाजी मस्तान माझा पत्नीच्या बहिणीचा नवरा होता. याबाबत कुठेही वाश्चता केल्यास जिवे ठार मारण्याची धमकी व्यावसायिकाने दिली असल्याचा दावा महिलेने तक्रारीत केला आहे. या प्रकरणी अंबोली पोलिसांनी गुन्हा दाखल करून हा गुन्हा पुढील तपासासाठी अंधेरी एमआयडीसी पोलिसांकडे वर्ग केला आहे. या प्रकरणी पोलिस वस्तुस्थिती पडताळून घेत सखोल तपास करत आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com