
Jitendra Awhad On Shinde-Fadnavis Government: 'महाराष्ट्र सरकारच्या हातून आज ऐतिहासिक चूक झाली आहे. आज ३४९ वा शिवराज्याभिषेक दिन असताना तो ३५० करण्यात आला', असं राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत. शिवराज्याभिषेक सोहळ्यावरून आव्हाड यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत की, ''आज 350 वा राज्याभिषेक सोहळा नसताना तो 350 वा सोहळा करण्यात आला. कदाचित पुढच्या वर्षी जेव्हा शिवराज्याभिषेक सोहळा होईल, तेव्हा आपण मुख्यमंत्रीपदावर नसणार किंवा आपले कुठलेही सहकारी जागेवर नसणार. हा दृढ विश्वास असल्याने हा सोहळा आधीच आटोपता घ्यावा म्हणून आज शिवराज्याभिषेक दिन केला का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. (Latest Marathi News)
शिंदे यांना टोला लगावत ते म्हणाले, ''आताचे जे नेते आहे ते दूरदृष्टीचे नेते आहेत. पुढच्या वर्षी आपल्या हातून शिवराज्याभिषेक शोभाला होणार नाही, म्हणू या वर्षी केलं.''
दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आव्हाड यांनी उल्हासनगरमधील एका कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यामुळे सिंधी समाजात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानतंर हिललाईन पोलीस ठाण्यात भादंवि १५३ अ, १५३ ब, २९५ अ आणि २९८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बुधवारी ठाण्याच्या कोपरी भागात सिंधी समाजाने आक्रमक होत मेळावा घेतला आणि आव्हाडांच्या वक्तव्याचा निषेध केला. एवढेच नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे असंसदीय शब्दांचा वापर करणाऱ्या आव्हाडांची आमदारकी रद्द करण्याची मागणी करणार असल्याची भूमिका देखील समाजाने घेतली आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.