Permission Of Loudspeekar: सांगलीत ३५८ मशिदी, ६३ मंदिरांचे परवान्यासाठी अर्ज दाखल

६४ मशिदींना नियमाप्रमाणे ध्वनीक्षेपक लावण्यास परवानगी दिली. तर २६ मंदिरांना परवानगी देण्यात आली आहे.
Permission Of Loudspeekar, loudspeaker issue news in Marathi, Sangli Latest News in Marathi, Sangli Marathi Latest News
Permission Of Loudspeekar, loudspeaker issue news in Marathi, Sangli Latest News in Marathi, Sangli Marathi Latest NewsSaam Tv

सांगली: राज्यात भोंग्यावरुन राजकारण चांगलेच तापले आहे. भोंग्याविरोधात मनसेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांनी ४ मे रोजी राज्यभर आंदोलन केलं. आता पोलिसांनीही भोग्याविरोधात कारवाई सुरु केली आहे. सांगलीत भोंग्याच्या परवागनीसाठी मंदिर आणि मशिदींनी अर्ज दाखल केले आहेत. (loudspeaker issue news in Marathi)

सांगली (Sangli) जिल्ह्यातील ४९५ मशिदींपैकी ३५८ मशिदींनी ध्वनिक्षेपक परवान्यासाठी अर्ज दाखल केले आहेत. तर ६४ मशिदींना विहित आवाजात ध्वनीक्षेपक लावण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर ६३ मंदिरांनी अर्ज केले असून २६ मंदिरांना परवानगी दिली आहे.

Permission Of Loudspeekar, loudspeaker issue news in Marathi, Sangli Latest News in Marathi, Sangli Marathi Latest News
MNS vs Shivsena | 'असली आ रहे है-नकली से सावधान'; सेना मनसे वाद आता अयोध्येत

राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सभेत मशिदींसमोर हनुमान चालीसा पठण करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर राज्यात भोंग्यावरून वातावरण तापले आहे. या पार्श्र्वभूमीवर जिल्हा पोलीस प्रशासनाने जिल्ह्यातील धार्मिक स्थळांना ध्वनिक्षेपक लावण्यासाठी परवाना घेण्याचे आवाहन केले होते. जिल्ह्यात एकूण ५०८ मशिदी असून त्यापैकी ४९५ मशिदीवर ध्वनिक्षेपकाचा वापर सुरू होता. तर १३ मशिदींवर ध्वनिक्षेपक लावलेले नव्हते.

पोलिसांच्या आवाहनानुसार ३५८ मशिदींनी परवान्यासाठी अर्ज केले असून पोलिसांनी आतापर्यंत ६४ मशिदींना परवानगी दिली आहे. तसेच जिल्ह्यात २५९६ मंदिरे असून त्यापैकी २६३ मंदिरांवरच ध्वनीक्षेपकाचा वापर होत होता. या २६३ पैकी ६३ मंदिरांनी परवान्यासाठी अर्ज केले असून २६ मंदिरांना आजअखेर परवाने दिले आहेत. इतर अर्जांची छाननी सुरू असून त्यांनाही लवकरच परवाने दिली जाणार आहे. उर्वरीत धार्मिक स्थळांनी ध्वनीक्षेपक परवान्यासाठी अर्ज करावेत असे आवाहन पोलीस (Police) प्रशासनाने केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com