Beed जिल्ह्यातील निजामकालीन 389 शाळांचे होणार पुनरुज्जीवन; 70 कोटी मंजूर

बीड जिल्ह्यातील निजामकालीन तब्बल 389 शाळांचे आता पुनरुज्जीवन होणार असून त्यासाठी 70 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. अशी माहिती सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.
Beed जिल्ह्यातील निजामकालीन 389 शाळांचे होणार पुनरुज्जीवन; 70 कोटी मंजूर
Beed जिल्ह्यातील निजामकालीन 389 शाळांचे होणार पुनरुज्जीवन; 70 कोटी मंजूरविनोद जिरे

बीड - बीड जिल्ह्यातील निजामकालीन तब्बल 389 शाळांचे आता पुनरुज्जीवन होणार असून त्यासाठी 70 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. अशी माहिती सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय नुकताच निर्गमित करण्यात आला आहे. या शाळांचे पुनरुज्जीवन करण्याचे काम लवकरच हाती घेणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले आहे. ते बीड जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभात बोलत होते.

हे देखील पहा :

ते म्हणाले, की मराठवाड्यातील निजामकालीन शाळांच्या बांधकामासाठी 200 कोटी रुपये एवढा निधी मंजूर करण्यात आला असून यामध्ये सर्वाधिक निधी हा बीड जिल्ह्यास दिला आहे. मराठवाड्यात सर्वात जास्त निजामकालीन शाळा या बीड जिल्ह्यात आहेत आणि या सर्वच शाळांच्या बांधकामासाठी, मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधत याची घोषणा केली असल्याचे, धनंजय मुंडे यांनी सांगितलं.

Beed जिल्ह्यातील निजामकालीन 389 शाळांचे होणार पुनरुज्जीवन; 70 कोटी मंजूर
कल्याण-मलंग रोडवर पहाटेच्या सुमारास जिवंत अर्भक ठेवून जाणारी महिला CCTV मध्ये कैद!
Beed जिल्ह्यातील निजामकालीन 389 शाळांचे होणार पुनरुज्जीवन; 70 कोटी मंजूर
Beed Breaking : मृत्यूने कवटाळले मात्र, लेकीचा आईच्या हातातील हात सुटला नाही!
Beed जिल्ह्यातील निजामकालीन 389 शाळांचे होणार पुनरुज्जीवन; 70 कोटी मंजूर
Nagpur Breaking : नागपूरच्या लकडगंज परिसरातील Sex Racket चा पर्दाफाश!

दरम्यान, यावेळी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे त्यांनी आभार देखील मानले. दरम्यान मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधत, बीड जिल्ह्यातील 22 शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने यावेळी गौरविण्यात आले. यावेळी व्यासपीठावर आमदार संदीप क्षिरसागर, आमदार संजय दौंड, जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com