मुख्यमंत्र्यांच्या सभेहून परतताना शिवसैनिकाच्या गाडीने चिमुकलीला उडवले!

या प्रकरणी सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे. चार जणांना पोलिसांनी अटक केलीय.
मुख्यमंत्र्यांच्या सभेहून परतताना शिवसैनिकाच्या गाडीने चिमुकलीला उडवले!
विभा सतीश राऊतमाधव सावरगावे

माधव सावरगावे

औरंगाबाद: काल रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या सभेला मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक आले होते. सभा झाल्यावर आपल्या गावी परतताना एका शिवसैनिकाच्या भरधाव‌ गाडीने एका वर्षीय चिमुकलीला उडवले आहे. ही घटना काल रात्री 11 वाजेच्या सुमारास औरंगाबाद (Aurangabad) शहरातील सिडको उड्डाणपूलाखाली API Corner येथे घडली. (Aurangabad News)

विभा सतीश राऊत
BIG Breaking : राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेसाठी तिसरा उमेदवार जाहीर

विभा सतीश राऊत (वय 4) असे चिमुकलीचे नाव आहे. ही चिमुकली व तीचे आईवडील आपल्या स्कुटीवर सिडको पुलाखाली थांबले होते. यादरम्यान सिडको बसस्थानकाच्या दिशेने एक भरधाव बोलेरोने त्यांच्या स्कुटीला धडक दिली. यामध्ये चिमुकली गाडीवरून खाली पडून गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी MGM रुग्णालयात दाखल केले, परंतु उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याप्रकरणी पोलिसांना विचारले असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत. तर, या प्रकरणी सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे. चार जणांना पोलिसांनी अटक केलीय.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com