'मंत्र्यांच्या ड्रायव्हरला 40 हजार आणि ST कर्मचाऱ्यांना 12 हजार पगार हे चुकीचे'

''आम्ही पण त्याच्या बाजूने आहोत मात्र आंदोलन करण्याची ही वेळ नाही. आंदोलन माघे घेऊन येणाऱ्या काळात आम्ही त्याच्यासाठी आंदोलन करू."
'मंत्र्यांच्या ड्रायव्हरला 40 हजार आणि ST कर्मचाऱ्यांना 12 हजार पगार हे चुकीचे'
'मंत्र्यांच्या ड्रायव्हरला 40 हजार आणि ST कर्मचाऱ्यांना 12 हजार पगार हे चुकीचे'SaamTV

सांगली : नवीन विषाणूची सध्या चर्चा आहे. पण कोरोनाची (Corona) भीती एवढी झाली आहे की 'सोज्या बेटे गब्बर आयेगा; तसं आता 'सोज्या बेटे कोरोना आ जायेगा! त्यामुळे या भीतीपोटी निर्णय घेताना अस्थिरता निर्माण होत असल्याचे वक्तव्य राज्यमंत्री बच्चू कडू (Minister of State Bachchu Kadu) यांनी सांगलीच्या (Sangali) इस्लामपूर मध्ये कृषी प्रदर्शन उदघाटन प्रसंगी केले.

हे देखील पहा -

दरम्यान यावेळी त्यांनी एसटी कर्मचाऱ्य़ाच्या बाजूने बोलत त्यांच्या पगारातील तफावत दाखवली ते म्हणाले 'मंत्र्यांच्या आणि कलेक्टरच्या गाडीच्या ड्रायव्हरला 40 हजार पगार मिळतो. पण जो ST कर्मचारी हजारो लोकांना घेऊन प्रवास करतो. त्याला फक्त 12 हजार पगार मिळत असेल तर हे चुकीचे आहे. तसेच आम्ही पण एसटी कर्मचार्यांच्या बाजूने आहोत, मात्र आंदोलन करण्याची ही वेळ नाही. आंदोलन माघे घेऊन येणाऱ्या काळात आम्ही त्याच्यासाठी आंदोलन करू असेही बच्चू कडू म्हणाले.

'मंत्र्यांच्या ड्रायव्हरला 40 हजार आणि ST कर्मचाऱ्यांना 12 हजार पगार हे चुकीचे'
अल्पवयीन मेहुणीच्या प्रेमात दाजी आंधळा; लग्न करण्यासाठी मित्रांच्या साह्याने बायकोची केली हत्या

तसेच जर सरकार 8 तास वीज देत असेल तर पूर्ण बिल वसूल करणे चुकीचे आहे. त्यावर सरकार निश्चितच विचार करेल. केंद्र सरकारने (Central Goverment) कृषी कायदे माघे घेतले शेतकऱ्यांचा विजय झाला आहे. मोदी सरकारच्या तानाशाहीचा नाश झाला असून केवळ कायदे माघे घेऊन चालणार नाही तर धोरण देखील बदलण्याची गरज आहे. मेक इन इंडिया (Make In India) म्हणायचे आणि शेतकऱ्याला नष्ट करेल असा शेतीमाल आयात करायचा अशी टीका देखील त्यांनी मोदी सरकारवरती केली.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com