बार्शीत सीताफळाच्या 42 जाती एकाच छताखाली

मराठवाड्याचे प्रवेशद्वार अशी ओळख असणाऱ्या बार्शीची आता 'सीताफळांचं क्लस्टर' (Custard apple cluster) म्हणून ओळख निर्माण झाली आहे.
बार्शीत  सीताफळाच्या 42 जाती एकाच छताखाली
बार्शीत सीताफळाच्या 42 जाती एकाच छताखाली saam tv

बार्शी : सोलापूर (Solapur) हा कधीकाळी दुष्काळी समजला जाणारा जिल्हा आज फलोत्पादनात (Horticulture) आघाडीचा म्हणून ओळखला जातोय. 30-35 वर्षांपूर्वी जिल्ह्यात मंगळवेढा, सांगोला, माढा, करमाळा, माळशिरस या भागात जिद्दी शेतकऱ्यांनी प्रतिकूल परिस्थीवर मात करून फळबागांचा यशस्वी प्रयोग केला. दरम्यान, मराठवाड्याचे प्रवेशद्वार अशी ओळख असणाऱ्या बार्शीची आता 'सीताफळांचं क्लस्टर' (Custard apple cluster) म्हणून ओळख निर्माण झाली आहे. या प्रवासात बार्शीचे डॉ.नवनाथ कसपटे यांनी सीताफळांवर केलेले नवनवीन प्रयोग हे शेतकऱ्यांसोबतच अभ्यासकांना ही वेध घ्यायला लावत आहेत. (42 varieties of custard apple in Barshi under one roof)

बार्शीत  सीताफळाच्या 42 जाती एकाच छताखाली
नासाने हिंदु धर्माला टार्गेट केलं? नासाच्या त्या ट्विटमुळे नवा वाद

डॉ. नवनाथ कसपटे यांनी बार्शी तालुक्यातील गोरमाळे परिसरात सीताफळाचे उत्पादन घेताना अहोरात्र परिश्रम घेत सीताफळाच्या तब्बल 42 जाती जोपासल्या आहेत. या माध्यमातून इतर हजारो शेतकरी लखपती,करोडपती झाले आहेत.

'एन एम के 1'(गोल्डन) सीताफळाचे जनक डॉ.नवनाथ कसपटे यांची ही किमया. यंदा बहुसंख्य फळांच्या दराचे उच्चंक मोडत 'एन एम के 1' (गोल्डन) या वाणाच्या सीताफळाने ठोक बाजारपेठेत भाव खाल्ला आहे. प्रतिकिलो 280 रुपयांपर्यंतचा भाव प्रत्यक्ष शेतकऱ्याला मिळाला आहे.

डॉ. नवनाथ कसपटे यांनी 1985 सालापासून सीताफळाचे विविध वाण संकलन करण्यास सुरुवात केली. सध्या त्यांच्याकडे 42 वाणांची प्रत्यक्ष लागवड आहे. त्यामुळे 'मधूबन फार्मा आणि रोपवाटिके'मुळे बार्शी 'सीताफळांचं क्लस्टर' म्हणून नावारूपास आलं आहे. यामध्ये अर्कासहाण,अँनोना -7, एन एम के 3,ए×बी,चाँदसिडलिंग यांसारख्या वाणांचा समावेश आहे. तब्बल 9 एकर परिसरामध्ये 2500 रोपांवर 'क्रॉस पॉलिनेशन'ने हे प्रयोग केले जातात. येत्या काळामध्ये जवळपास अडीच हजार नवीन सीताफळाचे वाण निर्माण करण्याचा मानस डॉ.कसपटे यांचा आहे. त्यांचे हे काम कृषी विद्यापीठांना ही प्रेरणा देणारे आहे.

डॉ. कसपटे यांच्या सीताफळाच्या शेतीला भेट देण्यासाठी देश-परदेशातून शेतकरी,व्यापारी आणि उद्योजक 'मधूबन रोपवाटिके'त येत असतात. दररोज किमान शंभरच्यावर अभ्यासगट इथे येत असल्याची नोंद इथे आहे. पर्यटकांची ही वाढती संख्या लक्षात घेता 'मधुबन फार्म'वरती राहण्याची आणि जेवण्याची ही व्यवस्था करण्यात आली आहे.याठिकाणी प्रत्येक महिन्याला 200 प्रशिक्षणार्थींना 'एन एम के 1' (गोल्डन) सीताफळाच्या लागवडीपासून काढणी आणि विक्रीचे प्रशिक्षण दिले जाते. सीताफळ उत्पादन क्षेत्रात भरीव योगदान दिल्याबद्दल 'बंगळूर विद्यापीठा'ने 2008मध्ये मानद डॉक्टरेट देऊन सन्मान केला तर यंदा 'टॅंगो आंतरराष्ट्रीय विदयापीठा'ने मानद डॉक्टरेट देऊन सन्मान केला आहे. त्यामुळे कसपटे यांना बार्शी परिसरामध्ये 'सीताफळाचा डॉक्टर' म्हणून ओळखलं जातं.

Edited By- Anuradha

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com