Beed News : एटीएम वापरता येत नसल्याने अज्ञातांची मदत पडली महागात; तब्बल ४२ हजार लंपास

शेख यांनी एटीएम परत मागीतले असत्या त्या दोघांनी सारख्याच रंगाचे दुसरे एटीएम कार्ड शेख यांना दिले.
Beed News
Beed News Saam TV

Beed News : कधीही आणि कुठेही आपले बॅंकेतील पैसे काढता यावेत यासठी जागोजागी एटीएम सेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र काही व्यक्ती एटीएम कार्डचे नियम काटेकोरपणे पाळत नाहीत त्यामुळे त्यांची फसवणूक होते. बीडमध्ये अशीच एक फसवणूकीची घटना घडली आहे. यात हातचालाखीने एका व्यक्तीचे सर्व अकाउंट भामट्यांनी रिकामे केले आहे. पैसे काढण्याच्या बहाण्याने दोन चोरट्यांनी तब्बल ४२ हजार रुपये लंपास केले आहेत.

सदर घटना ही बीडच्या (Beed) माजलगाव शहरात घडली आहे. माजलगाव येथील बसस्थानकात असलेल्या एटीएममध्ये एक व्यक्ती त्याचे पैसे काढत होता. मात्र काही तांत्रीक अडचणींमूळे त्याला दुसऱ्यांची मदत घ्यावी लागली. एटीएममधून पैसे काढताना अज्ञात व्यक्तींची मदत घेऊ असे वारंवार सांगितले जाते. तरी देखील एटीएम बाहेर असलेल्या दोन मुलांची त्यांनी मदत घेतली. पुढे हिच मदत त्यांना महागात पडली.

Beed News
ATM Card : एटीएम कार्डचा पीन चुकीचा टाकला ? ब्लॉक झाले तर घाबरु नका, त्वरीत 'हे' करा

शेख माजेद शेख दौला (३२) असे फसवणूक झालेल्या व्याक्तीचे नाव आहे. शेख माजेद हे अशोक नगरमधील रहिवासी असून ते मजूरीचे काम करतात. मोठ्या मेहनतीने काम करून मिळवलेले पैसे काढण्यासाठी ते बस स्थानकाजवळ असलेल्या एसबीआय एटीएममध्ये (ATM) गेले होते. तिथे पैसे काढता येत नसल्याने बाहेर असलेल्या दोन मुलांची त्यांनी मदत घेतली. त्या मुलांनी त्यांचे एटीएम कार्ड घेतले. एटीएम मशीनमध्ये कार्ड टाकून पिन नंबरही टाकायला सांगितला. त्यांनंतर त्या दोन भामट्यांनी शेख माजेद यांना त्यांच्या खात्यात पैसे नसल्याचे सांगितले. शेख यांनी एटीएम परत मागीतले असत्या त्या दोघांनी सारख्याच रंगाचे दुसरे एटीएम कार्ड शेख यांना दिले. घरी येऊन एटीएममधील पैशांची शहानिशा करेपर्यंत चोरट्यांनी त्यांचे सर्व पैसे काढून घेतले होते.

Beed News
Beed News: राज्यपाल कोश्यारींच्या फोटोला जोडे मारो आंदोलनद; संभाजी ब्रिगेड आक्रमक

अकाउंटमध्ये एकूण ४२ हजार रुपये होते. ते सर्व चोरीला गेले. यामुळे शेख यांना मोठा धक्का बसला. आपली फसवणूक झाल्याचे समजताच त्यांनी माजलगाव शहरातील पोलीस स्थानकात धाव घेतली. या दोघांचा तपास पोलीस करत आहेत. तसेच एटीएममध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दोघांचेही कैद झालेले चेहरे पोलिसांच्या हाती लागले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com