Nagpur: 'आपली बस' होणार पर्यावरणपूरक; 438 बसेस होणार सीएनजी आणि इलेक्ट्रिक

महापालिकेच्या सर्व 438 बसेस (Bus) या सीएनजी आणि इलेक्ट्रिक वर चालणार आहे. मार्च अखेर सर्व बसेस सीएनजी आणि इलेक्ट्रिक वर होतील. तसंच आयुष्य संपलेल्या 237 बसेस या भंगारात काढल्या जाणार आहेत.
Nagpur: 'आपली बस' होणार पर्यावरणपूरक; 438 बसेस होणार सीएनजी आणि इलेक्ट्रिक
Nagpur Busसंजय डाफ

नागपूर - महानगरपालिकेच्या (Nagpur Municipal Corporation) वतीनं शहरात चालविली जाणारी आपली बस (Bus) आता पर्यावरणपूरक (Environment Friendly) होणार आहे. महापालिकेच्या सर्व 438 बसेस (Bus) या सीएनजी आणि इलेक्ट्रिक वर चालणार आहे. मार्च अखेर सर्व बसेस सीएनजी आणि इलेक्ट्रिक वर होतील. तसंच आयुष्य संपलेल्या 237 बसेस या भंगारात काढल्या जाणार आहेत.

हे देखील पहा -

शहरात धावणाऱ्या बसेस मुळं मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं. हे प्रदूषण कमी व्हावं यासाठी नागपूर महापालिकेच्या परिवहन विभागानं हा निर्णय घेतला आहे. सध्या महापालिकेच्या वतीनं शहरात 438 बसेस चालविल्या जातात. यातील काही बसेस सीएनजी वर तर इतर सर्व बसेस डिझेल वर आहेत. मात्र, आता या सर्व बसेस सीएनजी आणि इलेक्ट्रिक वर चालविल्या जाणार आहे.

केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत 40 ई-बसेस लवकरच शहरात दाखल होणार आहे. तर 60 बसेस अनुदान मिळाल्यावर खरेदी केल्या जाणार आहे. मार्च 2022 पर्यंत शहरात महापालिकेच्या सर्व बसेस पर्यावरणपूरक होणार असा अंदाज आहे.

Nagpur Bus
Beed: खाकीतली सौंदर्यवती बनली मिस महाराष्ट्र; तरुणीचं सर्वस्तरातून कौतुक

नागपूर महापालिकेकडे जेएनएनयूआरएम अंतर्गत मिळालेल्या 237 बसेसचं आयुष्य संपलं आहे. त्यामुळं या बस भंगारात काढल्या जाणार आहे. या बदल्यात नवीन पर्यावरण पूरक बसेस नागपुरात दाखल होतील. त्यामुळं शहरातील प्रदूषण कमी होण्यास नक्कीच मदत होणार आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com