Bank News : बँकेत पैसा सुरक्षित आहे का? RTIमधून धक्कादायक माहिती उघड

देशभरात असलेल्या ४७ बँकांची ३९ हजार कोटींनी फसवणूक केल्याची माहिती आरटीआयमधून उघड झाली आहे.
Bank
Bank Saam Tv

नागपूर : देशभरात असलेल्या ४७ बँकांची ३९ हजार कोटींनी फसवणूक केल्याची माहिती आरटीआयमधून उघड झाली आहे. देशाच्या वेगवेगळ्या भागातील ४७ बँकांमध्ये १ जानेवारी २०२२ ते ३१ डिसेंबर २०२२ या दरम्यान ६४ हजार ८५६ आर्थिक फसवणुकींचे प्रकरण नोंदवण्यात आले आहे. या प्रकरणात बँकांची ३९ हजार ६९८ कोटी ३७ लाख रुपयांनी फसवणूक झाली आहे, अशी धक्कादायक माहिती माहिती अधिकारातून हाती आली आहे. (Latest Marathi News)

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) केंद्रीय जन सूचना अधिकारी अभय कुमार यांनी नागूरातील RTI कार्यकर्ते अभय कोलारकर यांना ही माहिती दिली आहे. आपल्या कष्टाची कमाई सुरक्षित राहावी म्हणून लोक बँकेत पैसा ठेवतात. मात्र, गेल्या काही वर्षात बँकेतील घोटाळे उघडकीस आले आहे. यात कर्जबुडवे तसेच बँकेतील अधिकऱ्यांनी केलेल्या घोटाळ्याचा समावेश आहे.

Bank
Video : 'भास्कर जाधव नाक्यावरचा लुक्का'; निलेश राणेंची शिवराळ भाषेत टीका

देशभरातील राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका आणि सहकारी बँकांमध्ये हे घोटाळे झाले आहेत. 1 जानेवारी 2022 ते 31 डिसेंबर 2022 दरम्यान बँकांमध्ये एकूण 64 हजार 856 घोटाळे झाले. यात तब्बल 39 हजार 698 कोटी 37 लाख रुपयांचा अपहार झाला. तर कर्मचाऱ्यांनी 380 घोटाळे केले, यात 354 कोटी 76 लाख रुपयांचा अपहार केला, अशी माहिती आरटीआयमधून उघड झाली.

Bank
Video :...तर उद्धव ठाकरेही चोरमंडळाचे सदस्य ठरतात; फडणवीसांनी घेतला संजय राऊतांच्या विधानाचा खरपूस समाचार

सर्वसामान्य व्यक्ती आपल्या घामाची पैसा सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वात जास्त विश्वास बँकेवर ठेवतात. बँक त्यांना सर्वात सुरक्षित वाटते. मात्र, या घोटाळ्यामुळे बँकांच्या विश्वासावर तडे जात आहे. त्यामुळं सरकारने बँकिंग (Banking) सेक्टरमध्ये होणाऱ्या फसवणुकीला गांभीर्याने घेणे गरजेचे आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com