गोंदिया जिल्ह्यात महावितरणची विद्युत तार अंगावरती पडल्याने 5 जनावरांचा जागीच मृत्यू!

वीजेचा दाब जास्त असल्या कारणाने जनावरे जागीच ठार झाली आहेत.
गोंदिया जिल्ह्यात महावितरणची विद्युत तार अंगावरती पडल्याने 5 जनावरांचा जागीच मृत्यू!
गोंदिया जिल्ह्यात महावितरणची विद्युत तार अंगावरती पडल्याने 5 जनावरांचा जागीच मृत्यू!SaamTV

गोंदिया : गोंदिया जिल्हातील (Gondiya District) आमगाव तालुक्यातील नवेगाव येथे नगर पांदण शिवारात जनावरे चरत असताना त्या शिवारातील खांबामधून महावितरणची वीज (MSEDCL) वाहक तार अचानकपणे तुटून चरणाऱ्या जनावरांच्या अंगावर पडली या वीज घेऊन जाणाऱ्या तारांमधील वीजेचा दाब जास्त असल्या कारणाने ज्या पाच जनावऱ्यांच्या अंगालरती ती तार पडली ती जनावरे जागीच ठार झाली आहेत.(5 animals died due to electric wire falling on MSEDCL)

हे देखील पहा-

या जनावरांच्या मागे काही अंतरावरती शेतकरी असल्यामुळे ते सुदैवाने बचावले आणि मनुष्यहाणी झाली नाही. मात्र शेतकरी नंदलाल धनलाल बिसेन आणि शेतकरी संतोष उरकुडा पटले यांच्या जनावरांचे नुकसान झाले असून यात चार म्हैशी आणि एका गायीचा समावेश होता या मुक्या प्राण्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान या जनावरांच्या मृत्यूमुळे शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले आहे त्या नुकसानाची भरपाई आमगाव महावितरनाने द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

Edited By - Jagdish Patil

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com