
CM Eknath Shinde : परभणीच्या (Parbhani) सोनपेठ तालुक्यात सेफ्टीक टँकची (safety tank) सफाई करताना 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. सोनपेठ तालुक्यातील भाऊचातांडा शिवारात ही घटना घडली. हे सर्व मृत एकाच कुटुंबातील होते. या घटनेची दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मृतांच्य कुटुंबीयांना प्रत्येकी 10 लाखांची मदत जाहीर केली आहे. तसंच जखमींच्या उपचाराचा खर्च देखील सरकारकडून केला जाणार आहे.
मुख्यमंत्री कार्यालयाकडून याबाबत ट्वीट करण्यात आले आहे. या ट्वीटमध्ये असे लिहिले आहे की, 'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं असून मृतांच्या वारसांना राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या यासंदर्भातील योजनेतून प्रत्येकी 10 लाख रुपये देण्याचे निर्देश दिले आहेत. या दुर्घटनेतील जखमी झालेल्या कामगारावर आवश्यक ते सर्व वैद्यकीय उपचार शासनाच्या खर्चातून करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी आज दिले.'
'गुरुवारी, रात्री 9 वाजेच्या सुमारास भाऊचा तांडा येथील शेत वस्तीवरील एका घरातील सेप्टिक टॅंकमधील मैला सफाई करताना पाच जणांचा गुदमरून मृत्यू झाला होता. एका कामगारास गंभीर अवस्थेमध्ये अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती समजताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्वरित आवश्यक ती मदत देण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.', असे ट्वीटमध्ये सांगितले आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी असलेल्या सहाव्या मजुराला परळी येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. शेख साबेर (18 वर्षे) असे या जखमी तरुणाचे नाव असून त्याचीही प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमध्ये शेख सादेक (45 वर्षे), शेख शाहरुख (19 वर्षे), शेख जुनेद (29 वर्षे), शेख नवीद (25 वर्षे), शेख फिरोज (19 वर्षे) या पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.