गृहमंत्र्यांच्या सचिवाचे ५० हजार चाेरीस; फलटणला गुन्हा नाेंद

त्यानंतर शिंदे यांनी पोलिस ठाण्यात जाऊन संबंधित प्रकाराची तक्रार दिली.
Money
Money

सातारा : लग्न सोहळ्यासाठी आलेल्या गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (dilip walse patil) यांचे खासगी सचिव बाबासाहेब शिंदे यांच्या वाहनातून ५० हजार रुपये आणि महत्वाची कागदपत्रे चोरीस गेली आहेत. याबाबत शिंदे यांनी फलटण शहर पोलिस ठाणे येथे तक्रार नाेंदविली आहे. दरम्यान गृहराज्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात गृहमंत्र्यांच्या सचिवांना चोरांनी झटका दिल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे.

Money
पुढच्या वर्षी पहिलीत जाणा-या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे खासगी सचिव बाबासाहेब शिंदे हे सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील धुळदेव येथे एका लग्न सोहळ्यासाठी आले हाेते. त्यांच्या वाहनाची काच फोडल्याचे त्यांच्या लक्षात आले.

यावेळी वाहनातील ५० हजारांची रोख रक्कम आणि महत्वाची कागदपत्रे चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर शिंदे यांनी पोलिस ठाण्यात जाऊन संबंधित प्रकाराची तक्रार दिली. दरम्यान गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्याच जिल्ह्यात खुद्द गृहमंत्र्यांच्याच वाहनाची काच फोडून चोरीची घटना घडल्यामुळे सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com