अमरावती हिंसाचार प्रकरणात ५७ गुन्हे दाखल, ३१५ आरोपींना अटक!

अमरावती शहरातील परिस्थिती पाहता सकाळी ७ वाजल्यापासून ते रात्री ९ पर्यंत शहरातील बाजारपेठ सुरू राहणार असून रात्री ९ पासून सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी राहणार आहे.
अमरावती हिंसाचार प्रकरणात ५७ गुन्हे दाखल, ३१५ आरोपींना अटक!
अमरावती हिंसाचार प्रकरणात ५७ गुन्हे दाखल, ३१५ आरोपींना अटक!अरुण जोशी

अमरावती : अमरावती शहरातील परिस्थिती पाहता सकाळी ७ वाजल्यापासून ते रात्री ९ पर्यंत शहरातील बाजारपेठ सुरू राहणार असून रात्री ९ पासून सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी राहणार आहे. जवळपास १५ तास शहरातील बाजारपेठ सुरू राहणार आहे. अमरावतीत हिंसाचारा दरम्यान झालेल्या नुकसान व लूटमार विरोधात पोलिसांनी आतापर्यंत एकूण ५७ गुन्हे दाखल केले असून ३१५ आरोपींविरोधात गुन्हे दाखल केले असल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ.आरती सिंह यांनी आज प्रसार माध्यमांसोबत बोलतांना दिली.

हे देखील पहा :

अमरावती शहरात घडलेल्या हिंसात्मक घटनेवर पोलिसांनी नियंत्रण मिळविल्यानंतर शहरातील संचारबंदीत टप्प्याटप्प्याने शिथिलता देण्यात येत आहे. मंगळवारपासून संचारबंदीत मोठी शिथिलता देण्यात आली आहे. सकाळी ७ वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंत शहरातील सर्व बाजारपेठ सुरू राहणार आहे. रात्री ९ पासून सकाळी ७ वाजेपर्यंत शहरात कडक संचारबंदी राहणार आहे. संबंधित आदेश पोलीस आयुक्त डॉ.आरती सिंह यांनी निर्गमित केले आहे. तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती, फळ व भाजीपाला मार्केट तसेच सक्करसाथ, इतवारा यांना दिलेली सूट ही कायम राहणार आहे.

अमरावती हिंसाचार प्रकरणात ५७ गुन्हे दाखल, ३१५ आरोपींना अटक!
बायकोच्या प्रियकराला कापून मृतदेह भट्टीत जाळला! 'दृश्यम' सिनेमाप्रमाणे खून
अमरावती हिंसाचार प्रकरणात ५७ गुन्हे दाखल, ३१५ आरोपींना अटक!
२० वर्षीय युवतीवर वारंवार बलात्कार! लोणी पोलिसात गुन्हा दाखल

सध्या अमरावती शहरातील वातावरण सामान्य झाले असून सर्व व्यवहार सुरळीत झाले आहे. हिंसाचारादरम्यान ज्या नागरिकांनी लुटपाट हिंसा घडवणे जाळपोळ करणे अश्या नागरिकांच्या विरोधात पोलिसांनी अटकसत्र सुरु ठेवले असून आजपर्यंत तब्बल ५७ गुन्हे पोलिसांनी दाखल केले आहेत. तर, ३१५ आरोपीना अटक करण्यात आली आहे. सध्या पोलिसांनी शांतता समितीच्या बैठकांचे सत्र शहरातील विविध भागात राबविले असून त्याला दोन्ही समाजातील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे पोलीस आयुक्त डॉ.आरती सिंह यांनी सांगितले.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com