मराठवाडा सुखावला! जायकवाडी ५८ टक्क्यांवर

नाशिक आणि नगर जिल्ह्यातून विसर्ग वाढल्यानं धरणातील साठ्यात झपाट्याने वाढ
मराठवाडा सुखावला! जायकवाडी ५८ टक्क्यांवर
मराठवाडा सुखावला! जायकवाडी ५८ टक्क्यांवरडॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद : मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी धरणातील पाणीसाठा आज सकाळपर्यंत ५८ टक्क्यांवर पोहचला आहे. आठवडाभरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील धरणक्षेत्रात नदी, नाले ओसंडून वाहत होते. आठवडाभरात जवळपास १० टक्क्यांनी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. शिवाय आता नाशिक जिल्ह्यातील काही धरणे पूर्णपणे भरल्याने त्यातून देखील पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.

यामुळे जायकवाडी धरणाची पाणी पातळी वेगाने वाढणार आहे. नाशिक जिल्ह्यातील दारणा, गंगापूर धरण समूहातून प्रमाणावर विसर्ग सुरू असल्याने नांदूर मधमेश्वर कालव्याच्या पुढे जवळपास १३ हजार ४०० क्यूसेक्स वेगाने पाणी गोदावरी नदीतून जायकवाडी धरणाकडे झेपावत आहे. त्यासोबतच अहमदनगर जिल्ह्यातील धरण आणि बंधारे भरल्याने मुळा, प्रवरा नदीपात्रातून हळूहळू पाणी गोदावरी नदीकडे येत आहे.

हे देखील पहा-

सध्या धरणात १४ हजार क्युसेस आवक सुरू आहे. त्यामध्ये आणखी मोठी वाढ होणार आहे. यावर्षी मराठवाड्यातील सर्वच भागात २ टप्प्यात मुसळधार पाऊस झाला. यामुळे जायकवाडी वगळता सर्वच धरण प्रकल्पातील पाणीसाठा हा शंभरीकडे गेला आहे. मात्र, जायकवाडी धरण क्षेत्रामध्ये मोठा पाऊस नसल्यामुळे जायकवाडी धरणातील पाणीसाठा वाढला नव्हता. आता त्यात गतीने वाढ होत आहे.

नगर आणि नाशिक जिल्ह्यातील धरण भरल्याने कालपासून विसर्ग सुरू केल्याने जायकवाडी धरणातील पाणीसाठ्यात वाढ होण्यास मदत होत आहे. सध्या नाशिक जिल्ह्यातील धरण समुहातील दारणा धरणातून १२ हजार ७८८ क्युसेस, कडवा धरणातून २ हजार ६०० क्युसेस, गंगापूर धरणातून २ हजार ५०० नांदूर मधमेश्वर मधून १३ हजार ४०० क्युसेस आणि इतर बंधाऱ्यातून विसर्ग गोदावरी पात्रात करण्यात येत आहे. नगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणातून ४ हजार ४०० क्युसेस, ओझर वेअर कालव्यातून विसर्ग करण्यात येत आहे.

मराठवाडा सुखावला! जायकवाडी ५८ टक्क्यांवर
अखेर उजनी धरण पोहोचले प्लस सात टक्क्यांवर

जायकवाडी (नाथसागर) धरणाची आताची स्थिती

पाणीपातळी मीटरमध्ये : 461.267

एकूण पाणीसाठा : 1996.278 दलघमी

जिवंत पाणीसाठा : 1258.172 दलघमी

धरणातील पाण्याची टक्केवारी : 57.95 टक्के

पाण्याची आवक : 19870 क्यूसेक्स

Edited By- Digambar Jadhav

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com