बीड पुन्हा हादरलं! घरातून उचलून नेत 6 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार

बीडच्या रामपुरी गावातील धक्कादायक अन संतापजनक घटना...
बीड पुन्हा हादरलं! घरातून उचलून नेत 6 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार
तलवाडा पोलीस ठाणे, बीडविनोद जिरे

विनोद जिरे

बीड: गेल्या काही दिवसांपूर्वीच, बीड आणि परळीत घडलेली सामूहिक बलात्काराची घटना ताजी असतानाचं, आता पुन्हा जिल्ह्यात 6 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार झाल्याची घटना घडलीय. मध्यरात्री 12 च्या दरम्यान घरातून उचलून नेऊन, 6 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करण्यात आलाय. ही धक्कादायक अन संतापजनक घटना बीडच्या गेवराई तालुक्यातील रामपुरी गावात उघडकीस आली आहे. सुंदर तायड (वय 25 रा. रामपुरी) असं नराधम आरोपीचे नाव आहे. (Beed Crime News)

तलवाडा पोलीस ठाणे, बीड
पाकिस्तान भूकंपाने हादरले!; अफगाणिस्तान, इराणलाही धक्के

आरोपी सुंदर तायड याने बुधवारी रात्री 11 च्या दरम्यान, पीडितेच्या घराबाहेर चकरा मारत होता. यादरम्यान त्याला पीडितेच्या आईने घराजवळून हाकलून दिले. मात्र मध्यरात्री 12 च्या दरम्यान नराधम आरोपी सुंदर, पुन्हा दारूच्या नशेत आल्यामुळे, पीडितेची आई घराजवळील आपल्या भावाला झोपेतून उठविण्यासाठी गेली असता, सुंदरने पीडित 6 वर्षीय चिमुरडीला घरातून उचलून अज्ञातस्थळी नेले. त्यानंतर त्या चिमुरडीवर अत्याचार करून तो फरार झाला. याप्रकरणी रात्री उशिरा बीडच्या तलवाडा पोलीस ठाण्यात, 376 व पोक्सो नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत.

हे देखील पहा-

दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वीच बीडच्या बेलूरा गावात सामूहिक बलात्काराची घटना घडली होती. त्यानंतर अवघ्या काही दिवसात परळीत देखील सामूहिक बलात्काराची घटना घडली. या दोन्ही घटना ताज्या असतानाच, आता पुन्हा एकदा 6 वर्षीय चिमुरडीवर अत्याचाराची घटना घडल्याने, जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान यामुळे बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून खाकीचा धाक संपलाय का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे महिला आयोगाच्या सदस्या देखील बीड जिल्ह्यातीलच आहेत. मात्र त्यांच्याकडून देखील आवाज उठवला जात नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.