Beed: HIV बाधित 7 जोडपे अडकले विवाहबंधनात, जिल्हा प्रशासनाने केले कन्यादान

जातीच्या उतरंडी ओलांडून शेकडो वऱ्हाडी मंडळींच्या साक्षीने, एका नवीन जीवनास आरंभ केला आहे.
Beed News
Beed News Saam TV

बीड: एचआयव्ही (HIV) बाधितांकडे पाहण्याचा दृष्टिकोन, नेहमीच समाजातील लोकांचा वेगळा असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळं आजही त्यांना दुर्लक्षित घटक म्हणून पाहिलं जातं. मात्र बीडमध्ये अशा 7 जोडप्यांना एकत्र आणून जिल्हा प्रशासन आणि सामाजिक संघटनांनी समोर येत त्यांचा सामूहिक विवाह सोहळा घडवून आणला आहे. त्यामुळे व्यथित होऊन  निराशामय जीवन जगणाऱ्या एचआयव्ही ग्रस्तांना कायमस्वरूपी आधार मिळाला आहे.

वधू वरांच्या आत धरलेलं हे अंतरपाठ, मंत्र अन मंगलाष्टका म्हणणारा पुरोहित, साक्षीला असलेले सर्व आप्तेगण आणि जिल्हाप्रशासन..हे पाहून इथं विवाह पार पडत आहे हे लक्षात आलेच असेल...आता यात काय नावीन्य असच तुम्हाला वाटत असेल.. तर आम्ही सांगतोय ते जरा नीट ऐका, हे सातही जोडपे एचआयव्ही बाधित आहेत. दुर्धर संसर्गानंतर जीवनात निराश न होता, जातीच्या उतरंडी ओलांडून शेकडो वऱ्हाडी मंडळींच्या साक्षीने, एका नवीन जीवनास आरंभ केला आहे.  हजारो वऱ्हाडी मंडळींच्या साक्षीने नवीन जोडीदारासोबत आनंदी जीवन जगण्याची उमेद घेऊन, या नवविवाहित दाम्पत्यांनी वैवाहिक जीवनाला सुरुवात केली आहे.

Beed News
तेलाचा जास्तीत जास्त २ वेळा वापर करा, नाहीतर कारवाई अटळ!

तर बीडचे अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी या जोडप्यांचे कन्यादान केले. सुनील लांजेवार यांनी मणी मंगळसूत्र देऊन सामाजिक जबाबदारी पार पाडली तर अजित पवार यांनी संसारउपयोगी साहित्य दिले. दुर्धर आजारातून जीवन जगताना या देखील जोडप्यांना आनंदी राहून संसार फुलविण्याचा अधिकार आहे. त्यामुळे समाजाने भेदभाव न करता अशा जोडप्यांना मायेची फुंकर घालावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने यावेळी केले.

दरम्यान कळत न कळत झालेल्या चुकीतून बऱ्याच जणांना एचआयव्ही सारख्या जीवघेण्या संसर्गाची लागण झालीय. अनेक जण या आजारामुळे खचून जातात, जीवन जगण्याची आस सोडून देतात. अशाच निराश आणि हतबल होऊन बसलेल्या या 7 जोडप्यांचे नव्याने रेशीमगाठी बांधल्याने त्यांना जगण्याची नवीन उमेद मिळालीय. मात्र समाजाने आतातरी या दुर्धर आजाराने ग्रासलेल्या व्यक्तीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला तर त्या सर्वांना जगण्याची नवी उमेद मिळू शकते, हे मात्र निश्चित...

Edited By: Pravin Dhamale

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com