Beed News: विधवा महिलेला ब्लॅकमेल करत रिक्षाचालकासह 7 जणांचा अत्याचार; धक्कादायक घटनेने बीड हादरलं

बीडमध्ये विधवा महिलेवर सामूहिक अत्याचार; महाराष्ट्राला हादरवणारी घटना
Beed News
Beed NewsSaam Tv

Beed Crime News: रिक्षात विसरलेली पर्स परत देण्याच्या बहाण्याने विधवा महिलेच्या घरात घुसून रिक्षाचालकाने तिच्यावर अत्याचार करत त्याचा व्हिडीओ तयार करून ब्लॅकमेल केलं. त्यानंतर रिक्षाचालकासह 7 जणांनी अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार बीडमध्ये उघडकीस आला आहे. (Latest Marathi News)

Beed News
MP Viral News: अय्यो! एक WhatsApp DP अन् तब्बल ५० लाखांच्या चोरीचा उलघडा; कारनामा पाहून पोलिसही हादरले

या प्रकरणी माजलगाव शहर पोलीस (Police) ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामुळे एकचं खळबळ उडाली आहे. बलात्काराची घटना ही बीड शहरात घडल्याने हा गुन्हा बीड शहर पोलीस ठाण्याकडे वर्ग केला जाणार आहे.

बीड (Beed) येथील एका विधवा महिलेची पर्स संदीप पिंपळे याच्या रिक्षात प्रवासादरम्यान विसरली होती. पर्स परत देण्याच्या बहाण्याने पिंपळे याने महिलेस बीडमधील कबाड गल्लीतील रूमवर बोलावून घेतले व या ठिकाणी तिच्यावर अत्याचार केला.

ही घटना 2014 साली घडली होती. या कृत्याचा मोबाइलमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करत रिक्षाचालकाने ब्लॅकमेल करत सतत तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर मित्र व नातेवाईकांना देखील व्हिडिओ देऊन बळजबरीने त्यांच्यासोबत संबंध ठेवण्यास भाग पाडले. (Beed Crime News)

Beed News
Pandharpur News: अंत्यविधी उरकून येताना काळाचा घाला; एकाच कुटुंबातील 3 महिलांचा जागीच मृत्यू

2020 मध्ये गोरख इंगोले याने जबरदस्तीने पीडितेला दुचाकीवर बसवून जरूड ते हिवरा पहाडी रोडलगत असणाऱ्या घाटात नेत त्याच्या 4 मित्रांकडून आळीपाळीने तब्बल 6 तास तिच्यावर अत्याचार केला. यामध्ये महिला गर्भवती राहिल्याने तिचा जबरदस्तीने गर्भपात देखील केल्याचं तक्रारीत म्हटलंय.

दरम्यान पीडित महिलेच्या फिर्यादीवरून संदीप पिंपळे (रा. कबाड गल्ली, बीड), बालाजी इंगोले, गोरख इंगोले (दोघेही रा. आहेर धानोरा, ता. बीड) यांच्यासह अनोळखी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com