कौटुंबिक न्यायालयात 705 प्रकरणे मध्यस्थीने निकाली

कौटुंबिक न्यायालयात 705 प्रकरणे मध्यस्थीने निकाली
कौटुंबिक न्यायालयात प्रकरणे निकाली काढल्यानंतर मार्गदर्शन करताना न्यायाधीश नेत्रा कंक.

अहमदनगर ः न्यायालयामधील अपासातील वाद मिटवण्यामध्ये मध्यस्थी व समुपदेशक महत्वाची भूमिका बजावत आहेत. त्यामुळे अनेक केसेस निकाली लागत आहेत. निःपक्षपातीपणे मध्यस्थी व समुपदेशन होणे हे कौटूंबिक न्यायालयात अत्यावश्यक आहे. गेल्या वर्षभरात नगरच्या कौटूंबिक न्यायालयात असलेल्या 876 केसेस पैकी 705 केसेस मध्यस्थी व समुपदेशनाच्या माध्यमातून सामुचाराने निकाली निघाल्या.

कौटूंबिक न्यायालयाचा अविभाज्य भाग असलेल्या मध्यस्थी व समुपदेशनचा खूप मोठा आधार आहे. यात सर्व वकिलांचा यात महत्वाचा रोल आहे. सर्व पक्षकरांनी न्यायालयामधील मध्यस्थी व समुपदेशनचा जास्तीतजास्त लाभ घ्यावा, असे आवाहन कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश नेत्रा कंक यांनी केले.

कौटुंबिक न्यायालयात प्रकरणे निकाली काढल्यानंतर मार्गदर्शन करताना न्यायाधीश नेत्रा कंक.
संगमनेरात पोलिसांनी रोखला बालविवाह

राष्ट्रीय लोक न्यायालयाच्या पार्श्वभूमीवर नगरच्या कौटुंबिक न्यायालयात शहर वकील संघटना व सेंट्रल बार असोसिएशनच्या वतीने मध्यस्थी प्रक्रियेबाबत जागरूकता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षास्थानाहून न्यायाधीश नेत्रा कंक बोलत होत्या. यावेळी वकील संघटनेचे अध्यक्ष अॅड. भूषण बऱ्हाटे, सेंट्रल बारचे अध्यक्ष अॅड. सुभाष काकडे, केंद्र सरकारचे वकील सुभाष भोर, प्रमुख वक्त्या अॅड. नीलमणी गांधी व अॅड.प्रज्ञा हेंद्रे, कौटुंबिक न्यायालायाचे अधिक्षक नवाझ शेख, समुपदेशक सुषमा बिडवे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी विशेष सरकारी वकील अॅड.सुरेश लगड, माजी अध्यक्ष अॅड. शिवाजी कराळे, महिला सचिव अॅड. मीनाक्षी कराळे आदींसह वकील उपस्थित होते.

अॅड. बऱ्हाटे म्हणाले, येत्या ९ सप्टेंबरला सर्व न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोक न्यायाकायाचे आयोजन करण्यात आले आहे. करोना प्रादुर्भावामुळे मोठ्या प्रमाणात न्यायालयात केसेस प्रलंबित आहेत. त्या निकाली काढण्यासाठी जास्तीतजास्त पक्षकारांनी लोक न्यायालयाचा लाभ घ्यावा.

सूत्रसंचालन अॅड. अभय राजे यांनी केले. अॅड. सागर पादीर यांनी आभार मानले. यावेळी अॅड. अनुराधा येवले, अॅड. सुनील तोडकर, अॅड. राजेश कावरे, राजेंद्र सेलोत, अॅड.अनिता राशिनकर, अॅड.अनिता दिघे, अॅड.वृषाली तांदळे, अॅड. पल्लवी पाटील, अॅड.प्रज्ञा उजागरे, अॅड. भणगे आदींसह न्यायालयाचे कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरांनी यावेळी कौटुंबिक न्यायालयाच्या परिसरात वृक्षारोपण केले.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com