विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची आर्थिक परवड; मंदिर बंद असतानाही भरले 71 लाखाचे वीज बिल

मंदिर समितीने तब्बल 71 लाखाचे वीज बिल भरले
विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची आर्थिक परवड; मंदिर बंद असतानाही भरले 71 लाखाचे वीज बिल
विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची आर्थिक परवड; मंदिर बंद असतानाही भरले 71 लाखाचे वीज बिलभारत नागणे

पंढरपूर - कोरोनामुळे Corona उद्योग आणि व्यवसाय अडचणीत आले आहेत. अशातच राज्यातील प्रमुख देवस्थानांनाही याचा मोठा फटका बसला आहे. पंढरपूरच्या Pandharpur विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे. दर वर्षी 55 ते 60 कोटीचे उत्पन्न मिळणाऱ्या मंदिर समितीला कोरोना काळात फक्त सहा कोटीचे उत्पन्न मिळाले आहे. त्यातून मंदिर समितीने तब्बल 71 लाखाचे वीज बिल भरले आहे. उत्पन्नापेक्षा खर्चाचे प्रमाण अधिक वाढले आहे तरीही मंदिर समितीने कोणतीही जोखीम न घेता विज बिल भरले आहे.

हे देखील पहा -

विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी देशभरातून हजारो भाविक पंढरपूरला येतात. प्रमुख चार यात्रांच्या निमित्ताने लाखो भाविक मोठ्या संख्येने गर्दी करतात. भाविकांनी दिसलेल्या देणगी तून‌ मंदिर समितीला दरवर्षी 55 ते 60 कोटीचे उत्पन्न मिळते. या उत्पन्नातूनच मंदिर समितीचा खर्च केला जातो. दरम्यान मागील दीड वर्षाच्या काळामध्ये कोरोना मुळे मंदिर समितीच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे.

विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची आर्थिक परवड; मंदिर बंद असतानाही भरले 71 लाखाचे वीज बिल
साईबाबा संस्थान सीईओ पदी भाग्यश्री बानायत यांची नियुक्ती

मंदिर समितीला दीड वर्षाच्या काळामध्ये केवळ सहा कोटीचे उत्पन्न मिळाले आहे .या उत्पन्नातून मंदिर समितीने अनेक उपक्रमही राबविले आहेत. शिवाय मुख्यमंत्री निधीसाठी १ कोटींचा दिले आहेत. त्यातच समितीने तब्बल 71 लाखाचे वीज बिल भरले आहे. उत्पन्नापेक्षा खर्च अधिक होत असल्याने मंदिर समितीची आर्थिक परवड सुरू आहे.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com