Melghat Tiger Reserve : सुवर्ण महोत्सवी वर्ष; मेळघाट व्याघ्र प्रकल्पात ७२ वाघांचे वास्तव्य

२२ फेब्रुवारी १९७४ ला अस्तित्वात आलेला हा व्याघ्र प्रकल्प वाघांच्या प्रजननास व वास्तव्यास अनुकूल ठरला आहे.
Melghat Tiger Reserve
Melghat Tiger ReserveSaam Tv

- अमर घटारे

Melghat Tiger Reserve : मेळघाटवर व्याघ्र प्रकल्पाचे (melghat tiger reserve) एकछत्री नियंत्रण असून मेळघाट वाघांसह अन्य वन्यजीवांचा सर्वोत्कृष्ट नैसर्गिक अधिवास ठरला आहे. देशातील (india) पहिल्या नऊ व्याघ्र प्रकल्पांपैकी सर्वात मोठा आणि राज्यातील (maharashtra) पहिल्या या व्याघ्र प्रकल्पाने पन्नासाव्या वर्षात पदार्पण केले आहे. आज ५० वा वर्धापन दिन साजरा होत आहे.

Melghat Tiger Reserve
Yavatmal Fire News : शेतक-याच्या स्वप्नांची झाली राख रांगाेळी; कुटुंबाला बसला माेठा धक्का

व्याघ्र संवर्धनात स्थिरावलेल्या या व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रफळ २ हजार ७०० चौरस किलोमीटर आहे. यात ३६१.२८ चौरस किलोमीटरचे गुगामल राष्ट्रीय उद्यान समाविष्ट आहे. एका वाघाला साधारणतः २५५ चौरस किलोमीटरचे क्षेत्र लागते.

या अनुषंगाने मेळघाटात शंभराहून अधिक वाघ वास्तव करू शकतात. आज व्याघ्र प्रकल्पात ५० वाघ आहेत. यात २१ मादी आणि २९ नर आहेत. याव्यतिरिक्त वाघांचे २२ छावे आहेत. नर मादी आणि छावे विचारात घेता आज मेळघाटात लहान मोठे ७२ वाघ वास्तव्यास आहेत. (Maharashtra News)

Melghat Tiger Reserve
Amravati : शिक्षकेतर कर्मचा-यांचा बेमुदत संप; अमरावती विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ रद्द

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील व्यवस्थापन आणि उपाय योजना टप्प्याटप्प्याने बदलत गेल्या आहेत. वाघ आणि वाघांचा नैसर्गिक अधिवास सुरक्षित ठेवण्याच्या अनुषंगाने वेगवेगळ्या परिणामकारक उपाय योजना राबविल्या जात आहेत. देशातील टॉप टेन पैकी तो एक आहे. एनटीसीच्या मूल्यमापन समितीच्या निष्कर्षात मेळघाट व्याघ्र प्रकल्प व्हेरी गुड' श्रेणीत आहे. पन्नासावे वर्ष मेळघाट व्याघ्र प्रकल्प विविध उपक्रमांनी साजरे करणार आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com