नगरमध्ये 74 वर्षीय महिलेवर घरात घुसून मारहाण करत बलात्कार!

आरोपीने रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत मध्यरात्रीच्या सुमारास, पीडित महिला घरात एकटी असताना तिच्या घरात घुसून एक हे दुष्कृत्य केले आहे.
नगरमध्ये 74 वर्षीय महिलेवर घरात घुसून मारहाण करत बलात्कार!
नगरमध्ये 74 वर्षीय महिलेवर घरात घुसून मारहाण करत बलात्कार!Saam Tv

अहमदनगर : अहमदनगरमध्ये (Ahmednagar ) माणुसकीला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरातील तारकपूर परिसरात एका 74 वर्षीय वृद्ध महिलेस मारहाण करून तिच्यावर बलात्कार (Rape) केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सदर प्रकरणी पोलिसांनी नराधमास ताब्यात घेतले असून या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अहमदनगर शहरातील तारकपूर परिसरात हि घटना घडली असून आरोपीने पीडित महिला घरात एकटी असताना तिच्या घरात घुसून एक हे दुष्कृत्य केले आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत मध्यरात्रीच्या सुमारास आरोपी घरात घुसला. त्यानंतर त्याने पीडितेला मारहाण केली आणि तिच्यावर अत्याचार केला.

अत्याचार करून आरोपीने घटनास्थळावरून पलायन केले. सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व पीडित महिलेचा जबाब नोंदवून तक्रार दाखल करून घेतली आहे. दरम्यान, पीडित महिलेला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिच्यावर उपचार सुरू असून पोलिसांनी तातडीने तपास करत आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती आहे. सदर प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com