Dhule News : पोलिसांना चकवा देत कार चालकाने जंगलात ठाेकली धूम; आठ लाखांची दारु जप्त

पोलिसांनी कारची कसून तपासणी केली.
Dhule News, dhule crime news
Dhule News, dhule crime news saam tv

Dhule Crime News : पिंपळनेर-नवापूर रस्त्यावर पिंपळनेर पोलिसांना रात्रीच्या वेळी गस्त घालत असताना संशयास्पद रित्या आढळून आलेल्या कारमध्ये अवैधपणे दारूची वाहतूक केली जात असल्याचे उघडकीस आले आहे. या कारवाई दरम्यान पोलिसांनी दारू साठ्यासह लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. दरम्यान संशयित कारसह अंधाराचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी झाला. (Maharashtra News)

Dhule News, dhule crime news
Saam Impact : 'साम टीव्ही' च्या बातमीनंतर प्रशासन खडबडून जागे झाले, शहापूरच्या 'त्या' समस्येवर उपाययाेजनेस प्रारंभ

साक्री तालुक्यातील पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पिंपळनेर-नवापूर रस्त्यावर मध्यरात्रीच्या सुमारास पोलीस पथक गस्त घालत असताना, पोलिसांना पांढऱ्या रंगाची कार संशयास्पद रित्या आढळून आली.

पोलिसांनी या कारचालकाला कार थांबविण्याचा इशारा देखील केला, परंतु कारचालकाने भरधाव वेगाने कार पळवत नेली व त्यावर संशय बळवल्याने पोलिसांनी तात्काळ या कारचा पाठलाग केला. परंतु काही अंतरावर गेल्यानंतर कार चालकाने रस्त्याच्या कडेला जंगलाच्या दिशेने कार उभी करून जंगलात पळ काढला.

Dhule News, dhule crime news
Bombay High Court Order : धाराशिव नव्हे उस्मानाबाद, जाणून घ्या मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश

या कारवाईदरम्यान पोलिसांनी पाठलाग करून देखील अंधाराचा फायदा घेत हा कारचालक पळून जाण्यात यशस्वी झाला. पोलिसांनी या कारची तपासणी केली असता या कारमध्ये देशी विदेशी दारूचा साठा पोलिसांना आढळून आला.

Dhule News, dhule crime news
Satara News : ...अन्यथा 2 दिवसांत सातारा बंद ठेवणार : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा सरकारला इशारा

या कारवाईदरम्यान पोलिसांनी तब्बल आठ लाखांहून अधिकचा दारू साठ्यासह मुद्देमाल हस्तगत केला आहे, चोरट्या मार्गाने अवैधपणे गुजरातकडे या दारूची वाहतूक केली जात असल्याचा संशय पोलिसांना असून पुढील तपास पिंपळनेर पोलीस करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com