भजनी मंडळाच्या वाहनास अपघात; आठ ठार, चार जखमी

भजनी मंडळाच्या वाहनास अपघात; आठ ठार, चार जखमी
nandurbar accident news

नंदुरबार : मध्यप्रदेश राज्यातील बडवानी जिल्ह्यातील शेमलेट गावचे रहिवासी भजन मंडळीचा कार्यक्रम करण्यासाठी 26 जण एका वाहनाने नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा येथे येत असताना सातपुडा या अतिदुर्गम भागातील तोरणमाळ येथील सिंधिदिगर घाट चढताना भीषण अपघात झाला. वाहनातील जादा लाेकांमुळे ते चढावर न जाता रिव्हर्समध्ये खाली जाऊ लागले. त्यावेळी चालकासह वाहनाच्या टपावरील काही मंडळींनी उडी मारून आपला जीव वाचवला. आत मध्ये बसलेल्यांसह वाहन खोल दरीत कोसळल्याने आठ जण जागीच ठार झाल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. या घटनेत चार जण गंभीर जखमी झाले आहेत. (8-people-die-in-accident-nandurbar-sml80)

जखमींना स्थानिक नागरिक व पोलिस प्रशासनाच्या मदतीने नंदुरबार व तोरणमाळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

सातपुडा डोंगररांगांमध्ये खडतर प्रवासाचे रस्ते असल्याने या परिसरात वारंवार अपघात घडतात. गेल्या सहा महिन्यात हा दुसरा अपघात झाला आहे. nandurbar accident news

Edited By : Siddharth Latkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com