Nashik: पॅरोलवर सोडलेल्या ८०० कैद्यांना पुन्हा कारागृहात हजर होण्याचे आदेश

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने या कैद्यांना येत्या 15 दिवसांत कारागृहात परतावे लागणार आहे.
Nashik: पॅरोलवर सोडलेल्या ८०० कैद्यांना पुन्हा कारागृहात हजर होण्याचे आदेश
Nashik Road JailSaam Tv

तबरेज शेख

नाशिक- कोरोना साथीमुळे 2020-21 मध्ये महाराष्ट्राच्या अनेक कारागृहामधून हजारो कैद्यांना पॅरोलवर सोडण्यात आले होते. तसेच नाशिकराेड (Nashik) मध्यवर्ती कारागृहाने पॅरोलवर साेडलेल्या 800 कैद्यांना पुन्हा कारागृहात हजर हाेण्यास सांगितले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने या कैद्यांना येत्या 15 दिवसांत कारागृहात परतावे लागणार आहे. त्याबाबतचा आदेश राज्य शासनाने काढले आहे.

हे देखील पाहा -

त्यानुसार अभिवचन रजेवर मुक्त करण्यात आलेल्या सर्व बंद्यांना तत्काळ कारागृहात दाखल करुन घ्यावे. बंद्यांना दाखल करुन घेताना आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक असून बंद्यांनी शासकीय रुग्णालयामध्ये वैद्यकीय तपासणी केल्यानंतर अहवाल प्राप्त झाल्यानंतरच कारागृहात दाखल करुन घ्यावे.

Nashik Road Jail
स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी ठरला 'लॉक अप’चा विजेता

अभिवचन रजेचा ४५ दिवसांचा अथवा वाढीव रजेचा ३० दिवसांचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर जास्तीत जास्त १५ दिवसांच्या वाढीव कालावधीत बंद्यांना दाखल करुन घ्यावे. बंदी कारागृहामध्ये दाखल न झाल्यास त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल होणार आहे.मात्र राज्य सरकारच्या या आदेशाविरोधात अनेक कैद्यांचे वकील कोर्टात धाव घेणार असल्याचे समाेर येते आहे. दरम्यान, याबाबत पॅरोलवर सोडलेल्या कैद्यांना कुठल्याही प्रकारचे लेखी आदेश मिळाले नसल्याने अनेक कैदी हे संभ्रमात आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.