Latur News : कासार बालकुंदा परिसरात ८५० वर्षांपूर्वीचा शिलालेख सापडला; चालुक्यकालीन इतिहासाचा होणार उलगडा

Inscription Found In Latur: महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील निलंगा तालुक्यातील कासार बालकुंदा येथे गावच्या पूर्वेला तीर्थ महादेव मंदिर आहे.
Inscription found in latur
Inscription found in laturदीपक क्षीरसागर

लातूर: लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील कासार बालकुंदा परिसरात ८५० वर्षांपूर्वीचा शिलालेख (Inscription) आढळून आला आहे. यातून महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील चालुक्य कालीन इतिहासाचा उलगडा होण्यासाठी मदत होणार आहे. (Inscription found in latur)

Inscription found in latur
Anil Deshmuk: अनिल देशमुखांना उच्च न्यायालयाने दिलेल्या जामीनाविरोधात ईडीची सर्वोच्च न्यायालयात धाव

चालुक्य राजा जगदेकमल्ल दुसरा यांच्या राजवटीत तो गोदावरीच्या प्रदेशावरून राज्य करत होता. तेव्हा मल्लर बिल्लय्या याने आजचे बालकुंदा येथे स्वयंभू सोमनाथ मंदिर बांधून व्यवस्थापनासाठी २७ मत्तर शेतजमीन सन ११४० मध्ये दान दिली. ही दान दिलेली जमीन बल्लकुंदेचा प्रभू सोमरस याकडे व्यवस्थापनासाठी सोपवली होती, असे या शिलालेखाच्या वाचनातून प्रथमदर्शनी दिसून येत आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील निलंगा तालुक्यातील कासार बालकुंदा येथे गावच्या पूर्वेला तीर्थ महादेव मंदिर आहे. येथे असलेल्या शिलालेखाचे आजपर्यंत कुठेच वाचन झाल्याचे आढळून आले नाही. शिलालेख इतिहास अभ्यासक कृष्णा गुडदे यांनी ठसे घेऊन व कर्नाटक हरिहर येथील कन्नड शिलालेख अभ्यासक प्रा. रविकुमार नवलगुंडा यांनी वाचन केले. यातून अनेक महत्त्वपूर्ण बाबींचा उलगडा झाला आहे. (Maharashtra News)

Inscription found in latur
Mulayam Singh Yadav: सपा नेते मुलायम सिंह यादव यांचं निधन; वयाच्या ८२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

येथे शिलालेख असल्याची माहिती स्थानिक लेखक, शिक्षक डॉ. नागेश पाटील यांच्याकडून गुडदे यांना मिळाली होती. कन्नड शिलालेखाचे वाचन डॉ. रविकुमार नवलगुंडा यांनी केले आहे. यासाठी सचिन पवार, डॉ. नागेश पाटील, प्रा. मारुती लोहार, सुनील बिराजदार, विजय पाटील, राम बुग्गे, गणेश पाटील यांचे सहकार्य लाभले.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com