देशात सहा महिन्यात 86 वाघांचा मृत्यु; महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर

वन खात्यापुढं व्याघ्र संरक्षणाचे आव्हाण
देशात सहा महिन्यात 86 वाघांचा मृत्यु; महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर
देशात सहा महिन्यात 86 वाघांचा मृत्यु; महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावरSaam Tv

नागपूर - भारतात सलग २ वर्षांपासून वाघांच्या Tiger मृत्यूची वाढती आकडेवारी चिंतेचा विषय ठरत आहे. गेल्या सहा महिन्यात भारतात 86 वाघांच्या मृत्यूची Tiger Death नोंद करण्यात आली आहे. यात महाराष्ट्र Maharashtra दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे वन खात्यापुढे व्याघ्र संरक्षणाचे मोठे आव्हान आहे.

कंझरर्वेशन लेन्सेसस अँड वाईल्ड लाइफ या वन्यजीव क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेने केलेल्या व्याघ्र गणनेत देशात सहा महिन्यात 86 वाघांचा मृत्यु झाल्याची माहिती पुढे आली आहे. यात महाराष्ट्रात 22 वाघांचा मृत्यु झाला असून दुसऱ्या क्रमांकावर आहे.

हे देखील पहा -

तर मध्य प्रदेशात 26 वाघांचा मृत्यु झाला असून देशात वाघांच्या मृत्यू मध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. एकिकडे देशात वाघांची संख्या वाढत असताना मृत्यु संख्येतही होत असलेली वाढ चिंतेचा विषय आहे. वन विभागाने यावर चिंता व्यक्त केली असून वाघांच्या संरक्षणाबाबत वन विभाग कटिबद्ध असल्याचे वन विभागाचे म्हणणे आहे.

देशात सहा महिन्यात 86 वाघांचा मृत्यु; महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर
Bakri Eid: घरीच नमाज अदा करीत बकरी ईद साजरी

कोणत्या राज्यात किती वाघांचा मृत्यू झाला

मध्य प्रदेश 26

महाराष्ट्र 22

उत्तर प्रदेश 8

केरळ 3

तामिळनाडू 1

उत्तराखंड 6

बिहार 2

पश्चिम बंगाल 1

कर्नाटक 11

आसाम 4

राजस्थान 2

गेल्या वर्षीच्या तुलनेत वाघांच्या मृत्यु प्रमाणात 153 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे ही वाढलेली वाघांच्या मृत्यूची आकडेवारी चिंतेचा विषय आहे. त्यामुळे आता वन विभागाकडे व्याघ्र संरक्षणाचे मोठे आव्हान आहे.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com