Shirdi : अमरावतीच्या 88 विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा, शिर्डीतील रुग्णालयात दाखल

विद्यार्थ्यांनी जेवण केल्यानंतर त्यांना उलटी आणि मळमळीचा त्रास सुरु झाला.
Shirdi, amravati, students
Shirdi, amravati, studentssaam tv

- सचिन बनसाेडेे

Shirdi : अमरावतीहून (Amravati) शिर्डी जिल्ह्यात (shirdi) आलेल्या विद्यार्थ्यांना (students) जेवणातून (food) विषबाधा झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली आहे. या घटनेतील 88 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात (hospital) दाखल करण्यात आले. (Breaking Marathi News)

Shirdi, amravati, students
Pandharpur : पंढरपुर विषबाधा प्रकरण; किराणा दुकानावर फूड अँड ड्रगचा छापा; 55 हजारांचा माल जप्त

अमरावती येथून चौथी ते सहावीच्या 230 विद्यार्थ्यांची सहल आयाेजित करण्यात आली हाेती. ही सहल नेवासा येथे पाेहचले. रात्री सहलीमधील विद्यार्थ्यांसाठी जेवण तयार करण्यात आले.

विद्यार्थ्यांनी जेवण केल्यानंतर त्यांना उलटी आणि मळमळीचा त्रास सुरु झाला. काहींनी जेवणातून विषबाधा झाली असावी असा अंदाज बांधला. त्यानंतर तातडीने 88 विद्यार्थ्यांना शिर्डीतील साईनाथ रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.

Shirdi, amravati, students
Mahashivratri : महाशिवरात्री निमित्त अंबरनाथ सज्ज, पाेलिसांसह पालिकेची जय्यत तयारी; अवजड वाहनांना बंदी

डाॅ. प्रितम वडगावे यांनी सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले. ते म्हणाले रात्री अकरा वाजता रूग्णालयात विद्यार्थ्यांना आणण्यात आले. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. धाेका टळला असला तरी या घटनेतील बाधितांवर लक्ष ठेवून आहाेत.

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com