
Beed News:बीडमध्ये काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घरगुती वादातून हत्या झाल्याची प्रथमिक माहिती समोर आली आहे. चुलत भावाने अल्पवयीन भावाची कोयत्याने वार करत निर्घृण हत्या केल्याचे गावकरी म्हणत आहेत. (Latest Marathi News)
मिळालेल्या माहितीनुसार, बीडच्या (Beed) वडवणी तालुक्यातील पिंपरखेड येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. सुरज श्रीकृष्ण शिंदे (१६) असं हत्या झालेल्या मुलाचं नाव आहे. तो रात्री आठच्या सुमारास घरातून बाहेर निघाला होता. श्रीकृष्ण हा गावातील चौकात पोहल्यावर अचानक गावातील लाईट्स बंद झाले. त्यानंतर कोयत्याने श्रीकृष्णवर सपासप वार करण्यात आले. यात तो पूर्ण रक्तबंबाळ झाला.
त्याच्यावर हल्ला होत असताना गावकऱ्यांना याची माहिती मिळताच त्यांनी त्याच्या दिशेने धाव घेतली. गावकऱ्यांची गर्दी पाहून मारेकरी तेथून पसार झाले. यावेळी गावकऱ्यांनी श्रीकृष्णला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला तपासले असता मृत घोषित केले. अशात पोलीस त्याच्या मारेकऱ्यांचा तपास करत आहेत.
काही दिवसांआधीच श्रीकृष्णचे त्याच्या चुलत भावाबरोबर वाद झाले होते. त्याचाच बदला म्हणून श्रीकृष्णच्या चुलत भावाने घेत त्याची हत्या केल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. पोलिसांनी संशयित चुलत भावाला ताब्यात घेतले आहे. तसेच त्याची चौकशी सुरू आहे. श्रीकृष्णचा खरा मारेकरी कोण हे शोधण्यासाठी पोलिसांनी कामात वेग घेतला आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.