Accident News: ह्रदयद्रावक! प्रेमासाठी घरातून पळाले, मृत्यूने रस्त्यातच गाठले; ट्रकच्या धडकेत प्रेमी युगूलाचा जागीच मृत्यू

लग्नासाठी घर सोडून पळून आलेल्या प्रेमी युगूलाची रस्ते अपघातात मृत्यू झाल्याची ही घटना अत्यंत दुर्देवी आहे.
Young Boy and Girl in Road Accident
Young Boy and Girl in Road AccidentSaamtv

Accident News: लग्नासाठी घरातून पळून आलेल्या प्रेमी युगूलाचा अपघातात मृत्यू झाल्याची दुखःद घटना समोर आली आहे. औरंगाबादकडे जाणाऱ्या मालवाहू ट्रकच्या धडकेत 20 वर्षीय तरूण आणि 14 वर्षीय तरूणीचा दुर्देवी मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. (Latest Marathi News)

Young Boy and Girl in Road Accident
Stone Pelting In Malkapur : क्रिकेट सामन्यानंतर तुफान दगडफेक; मलकापूर पाेलिसांत वीस जणांवर गुन्हा दाखल

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीहून पळून आलेल्या 20 वर्षीय तरूण आणि 14 वर्षीय तरूणीला औरंगाबादकडे जाणाऱ्या मालवाहू ट्रकने चिरडले. हा अपघात एवढा भीषण होता की, गंभीर जखमी झालेले तरुण तरुणी दोघे जागीच ठार झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

या भीषण अपघातात मृत्यू झालेल्या तरुणीचे आधारकार्ड पोलिसांना सापडले आहे. या सापडलेल्या आधार कार्डावरुन ही मुलगी दिल्लीची असल्याची माहिती समोर आली आहे.

Young Boy and Girl in Road Accident
Buldhana News: शिवसेनेच्या ठाकरे गटाचा नेता बेपत्ता झाल्याने खळबळ, पोलिसांकडून शोध सुरु

असीम अब्बास आणि असिका कौसर अशी या तरुण तरुणीची नावे आहेत. हे दोघे या ठिकाणी का आले याबाबतही पोलिसांना माहिती मिळू शकली नाही. फुलंब्री पोलीस या अपघाताचा तपस करत आहेत. या दुखद घटनेने सोशल मीडियावर हळहळ व्यक्त केली जात आहे. (Accident News)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com