हिंगोली : हिंगोली शहरात (Hingoli City) पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या २३ वर्षीय युवकाचा मैदानावरच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संघपाल नरवाडे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून तो वसमत शहरातील रहिवासी होता.
संघपाल गेल्या काही दिवसापासून दररोज हिंगोली शहरातील आदर्श महाविद्यालयाच्या मैदानावर आपल्या सहकारी मित्रांसोबत पोलीस भरतीची (Police) तयारी करत होता. मात्र, आज सकाळी मैदानावर धावत असताना संघपाल अचानक चक्कर येऊन जमिनीवर कोसळला.
पाहा व्हिडीओ -
त्यानंतर त्याच्या मित्रांनी तातडीने संघपालला हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले मात्र, उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी संघपालला मृत घोषित केले, दरम्यान संघापालच्या शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
Edited By - Jagdish Patil
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.