अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त तब्बल 45 फूट उंचीचा फ्लेक्स केला उभा
अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त तब्बल 45 फूट उंचीचा फ्लेक्स केला उभाविनोद जिरे

अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त तब्बल 45 फूट उंचीचा फ्लेक्स केला उभा

एकचं फ्लेक्स नसून यासारखे आणखी 3 फ्लेक्स हे शहरातील महत्वाच्या चौकात उभे करण्यात येत आहेत.

बीड: येणाऱ्या 22 जुलै रोजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार (Deputy CM Ajit Pawar) यांचा वाढदिवस असून यादिवशी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांकडून तोबा गर्दी केली जाते. तर याच वाढदिवसाचे औचित्य साधत, बीडच्या परळीत सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंनी (Dhananjay Munde) अनोखी तयारी सुरू केली आहे. त्यांनी परळी शहरातील महत्वाचा समजल्या जाणाऱ्या टॉवर चौकात, अजितदादा पवार यांची तब्बल 45 फुटांचा फ्लेक्स उभा केला आहे.

तर ही एकचं फ्लेक्स नसून यासारख्या आणखीन 3 फ्लेक्स हे शहरातील महत्वाच्या चौकात उभी करण्यात येत आहेत. ही फ्लेक्स खास परभणीहुन बनवण्यात आली आहेत. तर या एका फ्लेक्सला उभा करण्यासाठी 24 तास लागत आहेत.

अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त तब्बल 45 फूट उंचीचा फ्लेक्स केला उभा
मुंडे समर्थकांचे राजीनामा सत्र सुरूच; तर राणे समर्थकांमध्ये जल्लोष

दरम्यान दरवर्षी धनंजय मुंडे यांच्याकडून अजित दादा पवार यांचा वाढदिवस, विविध उपक्रमांनी साजरा केला जात असतो. यंदा देखील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, आरोग्य विषयक महाशिबीर घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर परळी सह जिल्ह्यातील विविध भागात, विविध सामाजिक उपक्रम साजरे करण्यात येणार आहेत. त्याची पूर्वतयारी 10 दिवस अगोदरचं सुरू असल्यानं, मुंडेंकडून सुरू असलेल्या या अनोख्या तयारीची, सध्या चांगलीच चर्चा रंगू लागली असून येणाऱ्या वाढदिवसाकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com