Akola Akot Taluka News
Akola Akot Taluka NewsSaam TV

Akola News : मुक्या जनावराला वाचवायला गेला अन् जीव गमावून बसला; मन हेलावून टाकणाऱ्या घटनेनं अख्खं गाव हळहळलं

विहिरीत पडलेल्या बकरीच्या पिल्लाला वाचविण्याच्या प्रयत्नात एका व्यक्तीने आपला जीव गमावला आहे.

Akola News : अकोल्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विहिरीत पडलेल्या बकरीच्या पिल्लाला वाचविण्याच्या प्रयत्नात एका व्यक्तीने आपला जीव गमावला आहे. ही दुर्देवी घटना अकोल्यातील (Akola) अकोट फाईल पोलीस स्टेशन हद्दीतील नायगाव परिसरात घडली. या घटनेमुळे परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे. (Latest Marathi News)

Akola Akot Taluka News
Nashik News : खेळता खेळता लिफ्टच्या खड्ड्यात पडला अन्.., १० वर्षीय चिमुकल्यासोबत घडली दुर्देवी घटना

गणेश डोमाळे (वय ६० वर्ष) असं मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचं नाव आहे. गणेश हे नायगाव येथील रहिवाशी असून त्यांचा रसवंती आणि चहा विक्रीचा व्यवसाय आहे.आज दुपारच्या सुमारास ते दुकानात असताना त्यांना परिसरातील एका विहिरीच्या काठावर बकरीची पिल्लं खेळताना दिसली.

ही बकरीचे पिल्ले विहिरीत पडू नये म्हणून गणेश हे त्यांना हाकलण्यासाठी गेले. यावेळी गणेश यांचा विहिरीत तोल गेला आणि पाण्यात बुडून त्यांचा या घटनेची माहिती मिळताच नागरिकांची गर्दी येथे जमा झाली. या बाबत अकोलट फाईल पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांचा ताफा घटना स्थळी दाखल झाला.

Akola Akot Taluka News
Viral News : केस ओढले, लाथाबुक्क्यांनी हाणलं, भररस्त्यात मुलींमध्ये WWE चा थरार, पोरं फक्त बघतच राहिली!

विहीर अतिशय खोल असल्याने येथे अग्निशमन दल तसेच अकोला महानगर पालिकेच्या ताफ्याला बोलविण्यात आले. दोन तासाच्या अथक परिश्रम नंतर गणेश याला विहिरीतून बाहेर काढण्यात आले पण वेळ झाल्याने गणेश डोमाळे यांची प्राणज्योत मालवली होती.

पोलिसांनी (Police) गणेश यांच्या मृतदेहाचा पंचनामा शवविच्छेदनासाठी अकोला शासकीय रुग्णालय येथे पाठविला आहे. मुक्या जनावराला वाचवण्याचा नादात गणेश यांना आपला जीव गमवावा लागल्याने परिसरातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com