कामशेत रेल्वे फाटकाजवळ भला मोठा खड्डा! आतापर्यंत तीन नागरिकांचा बळी

मावळ मधील कामशेत रेल्वे फाटकाजवळ रेल्वे प्रशासनाने एक वर्षापूर्वी भलामोठा खड्डा खोदला होता. या खड्ड्याने आतापर्यंत तीन नागरिकांचे प्राण घेतले आहेत.
कामशेत रेल्वे फाटकाजवळ भला मोठा खड्डा! आतापर्यंत तीन नागरिकांचा बळी
कामशेत रेल्वे फाटकाजवळ भला मोठा खड्डा! आतापर्यंत तीन नागरिकांचा बळीदिलीप कांबळे

मावळ : मावळ तालुका हा पर्यटनासाठी प्रसिद्ध असा तालुका आहे. तर, मावळ मधील कामशेत हे शहर दळणवळणासाठी असलेलं मुख्य शहर म्हणून ओळखले जाते. परंतु याच कामशेत मधील रेल्वे फाटकाजवळ रेल्वे प्रशासनाने एक भला मोठा खड्डा खोदून साच मागील एक वर्षांपासून तसाच सोडून दिला आहे आणि आता त्याचा त्रास कामशेतच्या आजूबाजूला असलेल्या सुमारे 10 गावांना होताना दिसत आहे.

त्यामध्ये पाणीही मोठ्या प्रमाणात साचलेले आहे. मात्र, अजूनही खड्डा हा बुजवण्यात आलेला नाही. रेल्वे प्रशासनाने रेल्वे गेट बंद करून भुयारी मार्गाने वाहनांना जाण्यासाठी हा खड्डा तयार केला होता. मात्र, हा खड्डा आता जीवघेणा ठरतोय. आतापर्यंत तीन नागरिकांचे बळी या खड्ड्याने घेतले आहेत. मात्र, तरी देखील अजूनही प्रशासनाला जाग येत नाही हि शोकांतिका म्हणावी लागेल.

हे देखील पहा :

रेल्वे प्रशासनाने खोदून ठेवलेल्या या खड्ड्यामुळे सहा ते सात किलोमीटरचा वळसा मारून कामशेतच्या आजूबाजूला असलेल्या 10 गावांतील लोकांना कामशेत मध्ये जावं लागत आहे. सध्याची परिस्थिती फारच बिकट आहे.  एकीकडे रेल्वे लाईन आणि दुसऱ्या बाजूला खड्डा याच्यामधून कशीतरी पायवाट नागरिकांनी शोधलेली आहे. 

मात्र, या पायवाटेवरुन जात असताना एखाद्याचा तोल गेला तर त्या खड्ड्यात आपले प्राण गमवावे लागतील आणि दुसरी कडून जर रेल्वे आली तरी तिथेही मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत तीन नागरिकांचे प्राण या खड्ड्यांने घेतलेले आहेत. मात्र आता आणखी किती जणांचे प्राण घेतल्यावर प्रशासनाला जाग येणार हा प्रश्न आता येथील नागरिक विचारू लागले आहेत.   

या रस्त्याने शाळेचे विद्यार्थी जातात तसेच विविध कामानिमित्त नागरिक जातात. आठवड्यापूर्वी रात्रीच्या वेळी एका महिलेचे दागिने ही या मार्गावर लुटले गेले. त्यामुळे आता महिलांसह शाळकरी मुलींमध्ये देखील फारच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कधी आमची छेडछाड होईल अशी भीती या विद्यार्थिनींच्या मनात आहे. 

कामशेत रेल्वे फाटकाजवळ भला मोठा खड्डा! आतापर्यंत तीन नागरिकांचा बळी
नांदेड दंगल प्रकरण; आरोपींची पोलिसांसोबत बाचाबाची! पहा Video

आतापर्यंत कित्येक वेळा ग्रामपंचायतचे सरपंच यांनी निवेदन दिलेले आहे.  मावळचे खासदार श्रीरंग बारणे, तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनीही या जागेची पाहणी केली. मात्र नागरिकांच्या हाती आली ती केवळ निराशाच! असे मत मुंडावळी गावचे सरपंच कळम थोरवे आणि विद्यार्थ्यांनी आपली व्यथा साम टीव्ही शी बोलताना व्यक्त केली.

दहा महिन्या पासून कामशेत मधील रेल्वे गेट जवळ भला मोठा खड्डा करून ठेवला आहे. रेल्वे प्रशासनाचा हेतू हा स्वच्छ होता. रेल्वे फाटकाच्या बाजूला भुयारी मार्ग करून सर्व वाहने या भुयारी मार्गाने जाणार होती. तसेच विद्यार्थीही लवकरात लवकर शाळेत पोहचतील तसेच हे देखील बंद होणार होते. मात्र, हा खड्डा आणि इथे होणाऱ्या भुयाराचे काम मागील दहा महिन्यांपासून बंद आहे.

या खड्ड्यामुळे तीन नागरिकांना प्राण गमवावा लागलेला आहे. एकीकडे रेल्वे लाईन आणि  दुसऱ्या बाजूला हा खड्डा आहे. रात्रीच्या वेळी येथे लुटमार होते. विद्यार्थिनींची छेडछाड होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर या खड्ड्यात काम करून आम्हाला रस्ता करून द्यावा एवढीच इथल्या नागरिकांचे व विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com