
विनोद जिरे
बीड: पुरोगामी महाराष्ट्र म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे. मात्र या पुरोगामी महाराष्ट्रात आजही जन्माने आलेल्या आपल्या जातीमुळं, अनेकांना बिनधास्त जगण्याचा स्वातंत्र्य मिळाला नाही ? कायद्यात प्रत्येक जातीला जगण्याचा मूलभूत अधिकार दिलाय. मात्र कुठंतरी हा अधिकार, कायद्याच्या रक्षकांकडूनचं हीरावून घेतला जातोय का ? असा प्रश्न समोर आलाय. असे म्हणतात की गुन्हेगारांना जात नसते, मात्र समाजात अशी एक जात आहे. ज्यांच्याकडे नेहमीच संशयाच्या नजरेनं पाहिलं जातं. आणि हाच संशयाचा डाग पुसून टाकण्यासाठी, पारधी समाजातील एका तरुणानं, समाजात सन्मानान जगता यावं, म्हणून या तरुणाने मोठ पाऊल उचललं आहे.
बीडच्या आष्टी तालुक्यातील वाखीतिखी गावातील, चारही बाजूने ओसाड डोंगर आणि त्यामध्ये असणार घर, घर एखाद्या सरपंच, ग्रामपंचायत सदस्य अथवा एखाद्या प्रतिष्ठित माणसाचे नाही. तर हे घर आहे एका पारधी कुटुंबाचं. गावात अथवा परिसरात एखादी गुन्हेगारी घटना घडली की सर्वात आधी याच कुटुंबाला लक्ष केले जातं. मात्र, आपण त्या गुन्ह्यात सहभागी नसून निर्दोष आहोत, असं सिद्ध करण्यासाठी या कुटुंबातील शामल काळे या तरुण मुलाने घराच्या चारही बाजूने सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घेतले आहेत.
काळे कुटुंब थोडीफार असलेली शेती कसून आपला उदरनिर्वाह करतं. तर शामल हा बीडच्या शिरूर इथल्या एका शाळेत दहावीच शिक्षण घेत आहे. त्याची शिक्षणाची मोठी जिद्द, चांगलं शिक्षण घेऊन मोठा अधिकारी बनण्याचं स्वप्न तो उराशी बाळगून आहे. मात्र वारंवार ज्या गुन्ह्यात सहभाग नाही. त्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याने, हे कुटुंब पुरते हतबल झाले आहे.
हे देखील पहा-
एखाद्या पारधी समाजाच्या घरावर बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे, ही राज्यातील पहिलीच घटना म्हणावी लागेल. आम्हाला देखील समाजात इतरांप्रमाणे जगण्याचा अधिकार आहे. त्यामुळे आमच्यावर होणारा अन्याय सिद्ध करण्यासाठी उचललेलं हे पाऊल असल्याचं भटके विमुक्त संघटनेचे समन्वयक अरुण जाधव यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, या कुटुंबा प्रमाणेच समाजात असे अनेक कुटुंब आहेत. की जे केवळ समाजातील विकृत व्यक्तींमुळे यात अडकून पडली आहे. त्यामुळेच समाजाने देखील आपला दृष्टिकोन बदलून या घटकाला स्वीकारणं गरजेच आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.