स्वातंत्र्यसैनिकांच्या निवासस्थानी लावणार नीलफलक
नीलफलक

स्वातंत्र्यसैनिकांच्या निवासस्थानी लावणार नीलफलक

अहमदनगर : शहराच्या गौरवात भर घालणाऱ्या, विविध क्षेत्रातील आदरणीय व्यक्तिमत्वांची स्मृती कायम राहावी तसेच त्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रसिक ग्रुपतर्फे अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. उद्या (गुरुवारी) सायंकाळी सहा वाजता शहरांतील चार गौरवशाली व्यक्तींच्या निवासस्थानी नीलफलक लावण्यात येणार असल्याची माहिती रसिक ग्रुपचे अध्यक्ष जयंत येलूलकर यांनी दिली.

रसिक ग्रुपने आतापर्यंत शहराचे नाव विविध क्षेत्रात समृद्ध करणाऱ्या मान्यवरांच्या निवासस्थानी नीलफलक लावले आहेत. नवीन पिढीलाही यातून या मान्यवरांच्या कार्य कर्तृत्वाची माहिती होते. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त रसिक ग्रुप देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेऊन आपले योगदान देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकाच्या निवासस्थानी हे फलक लावणार आहे. A blue board will be erected at the residence of the freedom fighters

नीलफलक
राज्यातील पैलवान होणार मालामाल, कुस्ती लिगमुळे मिळणार संधी

उद्या सायंकाळी अहमदनगर शहराच्या पाणी योजनेचे जनक माजी आमदार कै. डॉ. श्रीकृष्ण विश्वनाथ निसळ, ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक कै. जानकी रभाजीराव कवडे, ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक हाजी बी. यू. खान (बुक बाईंडर) व ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक कै. एकनाथराव रामचंद्र शिंदे यांच्या निवासस्थानी हे नीलफलक लावले जातील. हा सोहळा आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते व महापौर रोहिणीताई शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे.

याप्रसंगी उपमहापौर सर्वश्री गणेश भोसले, स्थायी समितीचे अध्यक्ष अविनाश घुले, नगरसेवक सुभाष लोंढे, नगरसेवक गणेश कवडे, नगरसेविका सुवर्णाताई गेणाप्पा, माजी नगरसेवक किशोर डागवाले, शहर बँकेचे अध्यक्ष सुभाष गुंदेचा, प्रेस क्लबचे अध्यक्ष शिवाजी शिर्के, ज्येष्ठ पत्रकार महेंद्र कुलकर्णी, ज्येष्ठ साहित्यिक प्रा.अनिल सहस्रबुद्धे, उद्योजक संतोष गुगळे, नंदराज केटरर्सचे संचालक राजेंद्र उदागे, फटाका असोसिएशनचे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा या मान्यवरांची प्रमूख उपस्थिती असणार आहे.

रसिक ग्रुपच्या या उपक्रमास नंदलाल केटरर्स यांचे बहुमोल योगदान असुन शिववरद ज्येष्ठ नागरिक संघाचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. मान्यवरांच्या निवासस्थानी नीलफलकाचे अनावरण झाल्यानंतर कार्यक्रम रंगारगल्ली, पटवर्धन चौक येथे होणार आहे. सरकारने घालून दिलेल्या कोविड निर्बंधानुसार नियमांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे, असे ज्येष्ठ नागरिक संघाचे बाबासाहेब वैद्य यांनी सांगितले.A blue board will be erected at the residence of the freedom fighters

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com