Gautami Patil Viral Video : जाळ अन् धूर संगटच!...;पठ्ठ्याची थेट गौतमीला टक्कर, 'पाटलांचा बैलगाडा' गाण्यावर जुगलबंदीचा व्हिडिओ व्हायरल

गौतमीची अदाकारी पाहण्यासाठी मोठी गर्दी उफाळून आली होती.
Gautami Patil Viral Video
Gautami Patil Viral Video Saam Tv

Shirdi Viral Video : लावणी डान्सर गौतमी पाटील ही सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. गौतमीचे कार्यक्रम सध्या तिच्या डान्सपेक्षा त्यात होणाऱ्या गोंधळामुळे चर्चेचा विषय ठरत आहेत. आता देखील तिच्या एका कार्यक्रमातील असाच एक भन्नाट व्हिडिओ समोर आला आहे. मात्र यामध्ये कोणताही गोंधळ झाला नसून जबदस्त जुगलबंदीचा डान्स झाला आहे. (Lavani Dancer)

नुकताच शिर्डी येथे गौतमीचा एक कार्यक्रम पार पडला. यावेळी गौतमीची अदाकारी पाहण्यासाठी मोठी गर्दी उफाळून आली होती. गौतमीचा डान्स पाहून सर्वच जण तिच्या आणि गाण्याच्या तालावर डोलू लागतात. आता देखील समोर आलेल्या व्हिडिओमध्ये एका तरुणाने गौतमीसमोर ठेका धरला आहे.

Gautami Patil Viral Video
Gautami Patil : जानू विना रंगच न्हाय! गौतमी पाटीलचा नांदच खुळा

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, गौतमी पाटील जशा स्टेप्स जशा अदा करत आहे तशीच अदाकारी आणि डान्स हा तरुण करून दाखवत आहे. स्टेजवर गौतमी पाटलांचा बैलगाडा या गाण्यावर नाचत आहे. तिला टक्कर देत हा तरुण स्टेजखाली नाचत आहे. एकीकडे गौतमीचं नृत्य पाहून सर्वजण तिच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी धावपळ करतात तर दुसरीकडे तिला पाहून हा तरुण तिच्या सारखा डान्स करत आहे.

सोशल मीडियावर या दोघांच्या जुगलबंदीचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओवर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या कमेंट केल्या आहेत. सदर व्हिडिओ हा शिर्डी येथील आहे. गौतमीच्या कार्यक्रमात नेहमी वाद आणि भांडणे होताना दिसतात. त्यामध्ये असा एक जुगलबंदीचा व्हिडिओ नेटकऱ्यांचं मनोरंजन करत आहे.

Gautami Patil Viral Video
Nagpur Crime News : अवघ्या ९ दिवसांच्या चिमुकलीची अडीच लाखात विक्री; धक्कादायक घटनेनं नागपूर हादरलं...

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com