Kalyan News: तळोजामध्ये बसला भीषण आग; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

नवी मुंबई महानगरपालिका परिवहन सेवेतील बसला भीषण आग लागली आहे.
Kalyan News
Kalyan NewsSaam TV

Kalyan News: तळोजा रोड परिसरात एक मोठी दुर्घटना घडली आहे. नवी मुंबई महानगरपालिका परिवहन सेवेतील बसला भीषण आग लागली आहे. खोणी तळोजा रोडवर वाशीवरून कल्याणच्या दिशेने ही बस निघाली होती. त्यावेळी ही दुर्घटना घडली. घटना घडली तेव्हा प्रवाशी बसमध्ये होते, मात्र सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. (Latest Kalyan News)

मिळालेल्या माहितीनुसर, नवी मुंबई महापालिका परिवहन विभागाच्या बसला आज (गुरुवारी) सकाळी दहा वाजता खोणी-तळोजा रस्त्यावरील नागझरी बस थांब्याजवळ अचानक आग लागली. चालकाने प्रसंगावधान राखून प्रवाशांना वेळीच सावध केल्याने जीवितहानी टळली. बस आगीत खाक झाली आहे. शार्टसर्किटमुळे आग लागली असण्याचा संशय अग्निशमन दलाच्या जवानांनी व्यक्त केला.

Kalyan News
औरंगाबाद महापालिकेच्या कामगार कल्याण विभागात तब्बल अडीच कोटींचा घोळ

नवी मुंबई परिवहन उपक्रमाची बस गुरुवारी सकाळी कल्याण-डोंबिवली दिशेने येत होती. खोणी-तळोजा रस्त्यावर असताना नागझरी गावा जवळील बस थांब्याजवळ बसमधून धूर येऊ लागला. चालकाने तात्काळ बस थांबून प्रवाशांना खाली उतरण्यास सांगितले. प्रवासी बसमधून उतरताच बसने पेट घेतला.

Kalyan News
Leopard Viral Video: कल्याण पूर्वेच्या कोळसेवाडीत बिबट्याचा धुमाकूळ; २ नागरिकांसह ३ जनावरांवर हल्ला

रस्त्याच्या दोन्ही बाजुला कंपन्या, गोदामे असल्याने काही वेळ या भागात भीतीचे वातावरण पसरले होते. काही क्षणात बसच्या चारही बाजूने आग लागली. आगीत बस भस्मसात झाली. चालकाने तात्काळ माहिती नवी मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांना दिली. नवी मुंबई परिवहन विभागाचे अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी पोहचले. त्यांनी तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवले. आगीत बसची आसन व्यवस्था, यंत्रसामुग्री जळून खाक झाली, अशी माहिती परिवहन विभागातील अधिकाऱ्याने दिली. दुसऱ्या बसने प्रवाशांना इच्छित स्थळी रवाना करण्यात आले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com