रेड्याच्या झुंजी लावून जुगार खेळल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

जालन्यात रेड्याच्या झुंजी लावून जुगार खेळल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रेड्याच्या झुंजी लावून जुगार खेळल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
रेड्याच्या झुंजी लावून जुगार खेळल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखललक्ष्मण सोळुंके

जालना: जालन्यात रेड्याच्या झुंजी लावून जुगार खेळल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जालन्यात बंदी असतानाही रेड्याच्या झुंजी लावल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जालना तालुक्यातील पिरकल्याण गावातील स्मशान भूमीशेजारी असलेल्या सरकारी गायरान जमिनीवर रेड्याची झुंज सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसानी या झुंज चालवणाऱ्याविरुद्ध कारवाई करत तब्बल १७ लाखांचा मुद्देमालही जप्त केला आहे. (a case has been registered against 4 people who conducting a buffalo fight)

हे देखील पहा -

तालुक्यातील पिरकल्याण या गावात न्यालायची बंदी असताना काही लोक पैसे कमवण्यासाठी रेड्याच्या झुंजी लावून जुगार खेळत असल्याची माहिती तालुका पोलिस ठाण्याच्या पोलिसांना लागताच पोलिसांनी रेड्याची झुंज लावून जुगार खेळल्या जात असलेल्या ठिकाणावर धाड टाकली. पोलिसांची गाडी पाहताच या जुगाऱ्यांनी शेताच्या दिशेने पळ काढला असता पोलिसांनी पाठलाग करून झुंज लावणाऱ्या शेख चिंग्या शेख गफार, राहणार जामवाडी, चांदभाई राहणार देवमूर्ती, सय्यद मुजीब सय्यद रफिक राहणार देवमूर्ती व किशोर कदम राहणार धारकल्यान या रेड्याच्या मालकांना ताब्यात घेऊन नागरिकांना विचारपूस केली.

रेड्याच्या झुंजी लावून जुगार खेळल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
परळीत भाजप पक्षाला रामराम ठोकत 200 कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

हे चारही रेड्याचे मालक आणि पैसे लावण्यासाठी आलेले इतर जुगारी यांनी गायरान जमिनीवर रेड्याची झुंज लावून जुगार खेळताना व खेळविताना रेड्या प्राण्यांना क्रूरतेने वागवून त्यांची झुंज लावून परिसरात कोरोनाच्या नियमांचे उलनघन करत गर्दी जमवत साथी रोगाचा प्रादुर्भाव होईल असे कृत्य केले म्हणून त्यांच्या विरुद्ध कलम 269, 270, 188 भादवीसह कलम12 (अ) मजुका सहकलम 11(1) (N) प्राण्यांची क्रूरता प्रतिबंधित कायद्यासह कलम 3,4 साथीरोग अधिनियम अन्वये तालुका जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, टेम्पो व दुचाकीसह १७ लाखांचा मुद्देमालही जप्त केलाय. पोलिसांच्या या कारवाईने परिसरात एकच खबळ उडाली असून या प्रकरणी अधिक तपास जालना तालुका पोलीस करताय.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com