विद्यार्थीनीकडून शरीरसुखाची मागणी करणारा 'तो' प्राध्यापक फरार

या प्राध्यापकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Nagpur Crime News Updates, Nagpur Crime News in Marathi
Nagpur Crime News Updates, Nagpur Crime News in Marathi Saam Tv

नागपूर : विद्यार्थीनींना परीक्षेत पास करण्याचे आमिष दाखवून प्राध्यापक शारिरिक सुखाची मागणी करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्राध्यापकाविरोधात पाचपावली पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर तो प्राध्यापक फरार झाला आहे. या प्राध्यापकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. (Nagpur Crime News in Marathi)

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विद्यार्थिनींना (Student) परीक्षेत पास करण्याचे आमिष दाखवून आणि विविध कारणांनी आर्थिक मदत देऊन त्यांच्याकडे शारीरिक सुखाची मागणी प्राध्यापक करत होता. त्या प्राध्यापकाला निलंबित करण्यात आले आहे.

हे देखील पाहा

पाचपावली पोलीस (Police) ठाण्याच्या हद्दीतील सिंधू महाविद्यालयात कार्यरत प्राध्यापकाविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. विद्यार्थिनींच्या आर्थिक अडचणी हेरून हा प्राध्यापक त्या मुलींची मदत करायचा आणि त्याऐवजी त्यांच्याकडे शारीरिक सुखाची मागणी करायची, अशी ओळख प्राध्यापकाची आहे. एवढचं नाही तर एखाद्या विद्यार्थिनीला एकट्यात गाठून तो मुलींच्या अंगाला नको त्या ठिकाणी स्पर्श करायचा अशी तक्रार पीडित मुलीने दिली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com