जालना: राजेश टोपेंच्या घराबाहेर स्प्रे पेंटींग करुन निषेध करणाऱ्या BJYM च्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

जालना: आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या निवासस्थानाबाहेर कलर स्प्रे पेंटींग केल्याप्रकरणी भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध जालन्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजेश टोपेंच्या घराबाहेर स्प्रे पेंटींग करणाऱ्या BJYM च्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
राजेश टोपेंच्या घराबाहेर स्प्रे पेंटींग करणाऱ्या BJYM च्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखललक्ष्मण सोळुंके

जालना: विद्यापीठ सुधारणा कायदा विधेयक महाराष्ट्र राज्य सरकारने मागे घ्यावे या मागणीसाठी जालन्यात भाजपा युवा मोर्च्याच्या (Bharatiya Janta Yuva Morcha) प्रा. सुजित जोगस यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले होते. राज्याचे आरोग्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्या भाग्यनगर येथील निवासस्थानासमोर कलर स्प्रे पेंटींग करून विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयक महाराष्ट्र राज्य सरकारने मागे घ्यावे या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले होते. (A case has been registered against BJYM activists who protested outside Rajesh Topes house)

हे देखील पहा -

जिल्ह्यात लावण्यात आलेल्या जमावबंदीचा आदेश जुगारून आणि कोराेना महामारीच्या नियमांचे पालन करावे यासाठी लावण्यात आलेल्या आपत्ती व्यवस्थापन कायदायचे उल्लंघन आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या विरुद्ध सोशल मीडियावर बदनामीकारक मजकूर व्हायरल केल्याप्रकरणी भाजपा युवा मोर्चाच्या (Bharatiya Janta Yuva Morcha) प्रदेश महामंत्री राहूल लोणीकर, सुजित जोगस यांच्यासह 13 कार्यकर्त्यांविरुद्ध जालना पोलिस ठाण्यात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला असून या प्रकरणी अधिक तपास पोलिस करत आहेत.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com