काँग्रेस नेता ः मी विनयभंग केलाय? थांबा, सीडी लावतो!

काँग्रेस नेता ः मी विनयभंग केलाय? थांबा, सीडी लावतो!
किरण काळे (शहर जिल्हाध्यक्ष, अ. नगर).

अहमदनगर ः काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. काळे हे काँग्रेसचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे कार्यकर्ते आहेत. एमआयडीसी पोलिस ठाण्यात एका महिलेच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल आहे. काळे यांच्यावर दाखल झालेला गुन्हा राजकीय द्वेषातून असल्याचे त्यांच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.A case has been registered against Congress leader Kiran Kale in Ahmednagar

काळे यांच्याकडे शहर जिल्हाध्यक्षपद आल्यापासून ते आक्रमक भूमिका घेत आहेत. सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी ते नेहमी आंदोलन करीत असतात. तीन दिवसांपूर्वी ते एमआयडीसीतील आयटी पार्कमध्ये आपल्या कार्यकर्त्यांसह गेले होते. हेच गुन्ह्यामागचे कारण ठरले आहे. तेथील महिला कर्मचाऱ्याने काळे यांनी लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले आहे. तसेच दमदाटी केली. काँग्रेस पक्षाचा मी पदाधिकारी आहे, असे तक्रारीत म्हटले आहे.

किरण काळे (शहर जिल्हाध्यक्ष, अ. नगर).
यंदा उडीद पेरला असता तर... बघा, कसला भारी भाव मिळतोय!

काळे यांच्यावर ३५४, ५०४, ५०६ यांच्यासह त्यांच्या आठ ते दहा कार्यकर्त्यांवर गु्न्हा दाखल झाला आहे.

राजकीय द्वेषाचा आरोप

नगर एमआयडीसीत राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नांतून आयटी पार्क पुन्हा सुरू झाले आहे. या पार्कमुळे लोकांना रोजगार मिळाला आहे. काळे यांनी आयटीपार्कमध्ये जाऊन स्टंटबाजी केली,हे आमदार जगताप यांच्या कार्यकर्त्यांना रूचलेले नाही. ते काळे यांच्या आंदोलनाला नेहमी हसण्यावारी नेतात. काळे आणि जगताप यांच्यात विळ्या-भोपळ्याचे नाते आहे.

यापूर्वीही काळे यांनी जगताप यांच्यावर बेछूट आरोप केले होते. पार्किंगच्या वादातून काळे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यावेळी हे प्रकरण मिटले होते. हे प्रकरण पुन्हा पोलिस ठाण्यात गेल्याने राजकीय वाद चिघळणार आहे. काळे यांना या प्रकरणात अडकवल्याचा काँग्रेस कार्यकर्त्यांचा आरोप आहे.A case has been registered against Congress leader Kiran Kale in Ahmednagar

जनतेला सीडी दाखवतो

काळे यांनी हे आरोप धुडकावून लावले आहेत. मी तेथे काय केले, याची सीडी माझ्याकडे आहे. ती मी प्रेस कॉन्फरन्स घेऊन वाजवणार आहे. त्यात जनतेसमोर सगळे प्रकरण येईल, एवढीच प्रतिक्रिया काळे यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com