सावकारी प्रकरणात इस्लामपुरात 12 जणांच्या टोळीवर गुन्हा दाखल

सांगलीच्या इस्लामपुरात बारा जणांनी बेकायदेशीर सावकारी करत एका कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा खळबळजनक प्रकार
सावकारी प्रकरणात इस्लामपुरात 12 जणांच्या टोळीवर गुन्हा दाखल
सावकारी प्रकरणात इस्लामपुरात 12 जणांच्या टोळीवर गुन्हा दाखल Saam Tv

सांगली : सांगलीच्या इस्लामपुरात बारा जणांनी बेकायदेशीर सावकारी करत एका कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. या टोळी विरुद्ध गुन्हा दाखल झाला असून यातील ४ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांना सोमवार पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या सावकारांच्या विरोधात बाजीराव दिनकर पाटील रा.इसलामपूर यांनी पोलिसात तक्रार दिली आहे.

बालम हनिफ जमादार रा. पेठ हिंदुराव बबन मोरे रा. कापूसखेड, संभाजी शिवाजी पवार रा. इस्लामपूर या तिघांशिवाय सांगली (Sangli) येथील तिघेजण व्यापारी (Merchant) तसेच वाळवा येथील पवार नामक व्यक्ती तसेच जगन्नाथ किसन चिखले,  सुजित पाटील इस्लामपूर (Islampur) धैर्यशील संभाजीराव पाटील रा. कामेरी ज्ञानदेव जाधव सातवे पवार यांच्यासह ३ व्यापारी आणि एक कापड दुकानदार (Shopkeeper) अशा १२ जणांच्या टोळीने बेकायदेशीर सावकारी चालू केली होती.

हे देखील पहा-

वरील सर्व संशयितांनी आपला गट करून बाजीराव पाटील यांना ऑक्टोबर २०२० ते नोव्हेंबर २०२१ या कालावधीमध्ये ठराविक सावकारी व्याजाने २२ लाख ९० हजार रुपये दिले होते. यातील संभाजी पवार यांच्याकडून ९० हजार रुपये घेतले होते. त्याला व्याजापोटी ७२ हजार ४०० देऊनही त्याने पाटील यांची दुचाकी जबरदस्तीने काढून घेतली होती. तर ज्ञानदेव जाधव याला ३ लाख पोटी १ लाख १४ हजार रुपये व्याज घेतले. मात्र, आणखी ३ लाख ६० हजार रुपयांची मागणी होत होती.

सावकारी प्रकरणात इस्लामपुरात 12 जणांच्या टोळीवर गुन्हा दाखल
ठाणे हादरले! अवघ्या पाच महिन्यांच्या चिमुकल्याची पाण्याच्या टाकीत बुडवून हत्या

या सर्व प्रकारात या सावकारांनी वेळोवेळी घरी येऊन आणि मोबाईल फोनवरून ९५ लाखाच्या रकमेची मागणी करत संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे पाटील यांनी तक्रारीत म्हटले आहे. तक्रारदार हे जिल्हा परिषद विभागात कनिष्ठ अभियंता म्हणून नोकरीस आहेत. या सावकारांच्या विरोधात लुटमार आणि खाजगी सावकारी प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यातील बालम जमादार हिंदुराव मोरे संभाजी पवार धैर्यशील पाटील यांना पोलिसांनी (police) अटक केली आहे. इतरांचा पोलीस शोध घेत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com