Akola Crime : रिपाई आठवले गटाच्या जिल्हाध्यक्षावर बलात्काराचा गुन्हा दाखल

गजानन कांबळे असं गुन्हा दाखल झालेल्या रिपाईच्या जिल्हाध्यक्षांचं नाव आहे.
Akola Gajanan Kambale
Akola Gajanan KambaleSaam TV

अकोला : रिपाईचे अकोला (Akola) महानगराध्यक्ष गजानन कांबळे यांच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. अकोला शहरातील रामदास पेठ पोलीस स्टेशनमध्ये (Police) त्यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला. लग्नाचं आमिष दाखवून वारंवार बलात्कार केला असल्याचा आरोप एका ३५ वर्षीय महिलेनं केला होता. पीडित महिलेच्या आरोपानंतर कांबळे यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Akola Todays News)

Akola Gajanan Kambale
Maharashtra Politics : शिंदे-फडणवीस सरकार बेकायदेशीर ठरू शकतं; कायदेतज्ञांनी मांडलं मत, पाहा VIDEO

अकोल्यातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे अकोला महानगराध्यक्ष गजानन काशिनाथ कांबळे (वय ४५) यांच्यावर एका ३५ वर्षीय महिलेने लग्नाचे आमिष दाखवत शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप केला आहे.

लग्नाचं आमिष दाखवून अनेकदा विविध हॉटेलवर नेत बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. हा प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. तसेच मारहाणही केल्याचा आरोप करण्यात आला. (Akola Latest Crime News)

Akola Gajanan Kambale
मोठी बातमी! सुप्रीम कोर्टाने शिंदे गटाला फटकारलं; काय आहे कारण?

याप्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार रामदास पेठ पोलीस ठाण्यात गजानन कांबळे यांच्यावर ३७६ (२) (N), ३२३, ५०४ आणि ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, गजानन कांबळे आणि तक्रारदार महिला यांच्यात गेल्या चार वर्षापासून ओळख असून पुढं त्यांचं प्रेमात रूपांतर झालं होतं.

दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर यासंदर्भात अधिक तपास रामदास पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजीवनी पुंडगे करीत आहेत.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com