मृताची विटंबना केल्याने ३५जणांवर गुन्हा दाखल
मृतदेहाची विटंबनाSaam Tv

मृताची विटंबना केल्याने ३५जणांवर गुन्हा दाखल

अहमदनगर : मुलाच्या आत्महत्येस पोलिस कर्मचारी जबाबदार असल्याने, त्याच्यावर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी मृतदेह थेट पोलिस ठाण्यात आणून त्याची हेळसांड व विटंबना करणाऱ्या ३० ते ३५ अनोळखींवर गुन्हा दाखल झाला आहे.

एका गुन्ह्यात संशयित म्हणून बालमटाकळीतील आदित्य अरुण भोंगळे (वय १७) यास पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्याची चौकशी करून त्यास दुसऱ्या दिवशी सोडून दिले. मात्र, त्याने मंगळवारी (ता. सात) बालमटाकळी येथे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

मृतदेहाची विटंबना
आमदार लंकेंचे सल्लागारच कायद्याच्या कचाट्यात, अॅट्रॉसिटी दाखल

त्यामुळे मुलाची आई संगीता भोंगळे यांनी, पोलिसाच्या जाचास कंटाळून मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप करीत, शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांनी पोलिस ठाण्यात रुग्णवाहिकेसह आणून ठेवला. संबंधित प्रकरणातील दोषी पोलिसांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नसल्याचा पवित्रा त्यांनी घेतला. मात्र, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंढे यांनी नातेवाइकांची समजूत घातल्यानंतर त्यांचा रोष कमी झाला. मृतदेहाची हेळसांड व विटंबना केल्याने ३० ते ३५ अनोळखी नातेवाइकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com