Breaking |झोपलेल्या चिमुकलीच्या गळ्याला नागाने वेटोळा घातलेला हा VIDEO पहाच

चिमुकली मुलगी आपल्या घरी रात्री अकरा ते बाराच्या दरम्यान गाढ झोपेत असताना अचानक जहाल विषारी असलेल्या कोब्रा नागाने तिच्या गळ्याला वेढा घातला आणि फणा काढून डोलू लागला.
Breaking |झोपलेल्या चिमुकलीच्या गळ्याला नागाने वेटोळा घातलेला हा VIDEO पहाच
Breaking |...अन झोपलेल्या चिमुकलीच्या गळ्याला नागाने घातला वेटोळा! पहा VIDEOSaamTvNews

वर्धा : वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यात असणाऱ्या बोरखेडी कला या गावात सात वर्षीय परी पद्माकर गडकरी हि चिमुकली मुलगी आपल्या घरी रात्री अकरा ते बाराच्या दरम्यान गाढ झोपेत असताना अचानक जहाल विषारी असलेल्या कोब्रा नागाने तिच्या गळ्याला वेढा घातला आणि फणा काढून डोलू लागला.

आपल्या गळ्याभोवती काहीतरी असल्याची व गार लागत असल्याची तिला जाणीव झाल्यानंतर तिला जाग आली. नागाला पाहून ती किंचाळल्याने शेजारी असलेल्या आई वडिलांना जाग आली त्यांनी जेव्हा हे भयानक दृष्य पाहिले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली! परंतु, सावध होऊन त्यांनी सर्प मित्राला पाचारण केले. तोपर्यंत आजूबाजूचे नागरिक देखील तिथे पोहोचले. समोर चाललेला हा थरार पाहून सर्वजण काहीकाळ स्तब्ध झाले होते.

Breaking |...अन झोपलेल्या चिमुकलीच्या गळ्याला नागाने घातला वेटोळा! पहा VIDEO
OBC Reserevation : सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय धक्कादायक

जवळ जवळ एक तासाच्या वर हा साप त्या मुलीच्या गळ्यावर डेरा धरून बसला होता. भयभीत झालेल्या मुलीची हालचाल होताच सापाने दंश केला आणि हा साप तिथून निघून दिवाण खाली गेला आणि दिसेनासा झाला. त्या चिमुकलीला तात्काळ सेवाग्रामच्या रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. झडशी जवळ असलेल्या बोरखेडी कला या गावात घडलेली या थरारक घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com